agriculture news in Marathi, low temperature in Gondia and parbhani, Maharashtra | Agrowon

गोंदिया, परभणी गारठले
टीम अॅग्रोवन
रविवार, 31 डिसेंबर 2017

पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. विदर्भातील गोंदिया व मराठवाड्यातील परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या आवारात ७.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

सध्या राज्यात कोरडे हवामान आहे. त्यामुळे थंडीत वाढ होत आहे. येत्या आठवडाभर ही थंडी कायम राहील. त्यानंतर काही अंशी चढउतार सुरू होतील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानाचा पारा पाच अंशांपर्यंत खाली घसरला होता.

 कोकणातील मुंबई, रत्नागिरी, डहाणू, भिरा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीनपर्यंत घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सोलापूर येथील किमान तापमानात दोन ते तीन अंशांपर्यंत घट झाली. नाशिक, जळगाव येथे सर्वात कमी ८.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. पुण्यातील किमान तापमानाचा पारा सरासरी एवढा असून ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.

मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने घटले असून ९.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. औरंगाबाद येथील किमान तापमानात नऊ अंशांपर्यंत होते. विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घटले. नागपूर, गोंदिया येथील किमान तापमान दहा अंशाच्या खाली आले. अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वाशीम, वर्धा यवतमाळ येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...