agriculture news in marathi, low temperature hits banana plant | Agrowon

तापमानघटीचा केळीबागांना फटका
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

जळगाव : किमान तापमानात मागील १० दिवसांपासून सतत घट होत असल्याने निसवणीच्या अवस्थेत असलेल्या नवती केळीबागांमध्ये निसवणीची प्रक्रिया मंदावली आहे. घड आखूड निसवत असून, लहान केळी रोपांवर करप्याचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. रावेर, यावल, चोपडा भागांत कमी तापमानामुळे समस्या (चिलिंग इंज्युरी) अधिक असल्याची माहिती आहे. सुमारे ११ हजार हेक्‍टर क्षेत्र कमी तापमानामुळे उद्‌भवलेल्या समस्यांमुळे बाधित झाले आहे.

जळगाव : किमान तापमानात मागील १० दिवसांपासून सतत घट होत असल्याने निसवणीच्या अवस्थेत असलेल्या नवती केळीबागांमध्ये निसवणीची प्रक्रिया मंदावली आहे. घड आखूड निसवत असून, लहान केळी रोपांवर करप्याचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. रावेर, यावल, चोपडा भागांत कमी तापमानामुळे समस्या (चिलिंग इंज्युरी) अधिक असल्याची माहिती आहे. सुमारे ११ हजार हेक्‍टर क्षेत्र कमी तापमानामुळे उद्‌भवलेल्या समस्यांमुळे बाधित झाले आहे.

केळीला किमान तापमान १२ अंश सेंटिग्रेडपेक्षा कमी असले, तर फटका बसायला सुरवात होते. अर्थातच मागील 10 ते 12 दिवसांपासून किमान तापमान 12 अंश सेंटिग्रेडखालीच आहे. सध्या 9 व 10 अंश सेंटिग्रेड यादरम्यान तापमान आहे. उतिसंवर्धित लहान केळीरोपे कमी तापमानामुळे उद्‌भवलेल्या समस्यांना लवकर बळी पडली आहेत. रोपांची वाढ खुंटली आहे. तसेच पाने पिवळी पडली आहेत. उतिसंवर्धित केळीरोपांखालील (दोन ते तीन महिन्यांच्या बागा) क्षेत्र सुमारे साडेतीन हजार हेक्‍टर आहे. रावेर, यावल व चोपडा भागांत हे क्षेत्र आहे. या भागातील लहान केळीबागा बाधित झाल्या आहेत.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी तापमानामुळे झाडांच्या प्रकाश संश्‍लेषणाच्या प्रक्रियेसह मुळांच्या विस्तारावर परिणाम झाला आहे. मुळ्या कमकुवत झाल्याने झाडाला जमिनीतून हवे ते व हवे तेवढे अन्नघटक मिळत नाहीत. तर करप्याला प्रोत्साहन देणारी बुरशी सक्रिय झाली असून, झाडाची पाने पिवळी पडत अाहेत. प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया मंदावली आहे. निवसणीवरील केळीबागा म्हणजेच नवतीचे क्षेत्र सुमारे 11 हजार हेक्‍टर असून, या बागांमध्ये कमी तापमानामुळे निसवणीची प्रक्रिया थांबल्यासातखी स्थिती आहे. जी झाडे निसवत आहेत, त्यांचे घड आखूड व हलक्‍या दर्जाचे येत आहेत. काही घड पोग्यातच अडकत आहेत.

बागांना ऊब मिळावी म्हणून शेतकरी रात्रीच्या वेळी बागांभोवती शेकोट्या पेटविणे, रात्रीच्या वेळी सिंचन करणे व करपा रोगाच्या अटकावासाठी बुरशीनाशकांच्या फवारण्या घेत आहेत.

सध्या निसवणीवर असलेल्या केळी बागांमध्ये घड पोग्यातच अडकणे, आखूड घड येणे अशा समस्या आहेत. तापमान कमी होत असल्याने हा फटका आणखी वाढेल.
- सत्त्वशील पाटील, शेतकरी, कठोरा (जि. जळगाव)

पाच महिन्यांच्या केळीमध्ये करपा अधिक आहे. त्याचे प्रमाण प्रतिझाड तीन पानांवर आहे. झाडांची वाढ हवी तशी नाही.
- जितेंद्र पाटील, शेतकरी, नारोद (जि. जळगाव)

इतर अॅग्रो विशेष
संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री...
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...