राज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप मोठी होईल.
अॅग्रो विशेष
महाबळेश्वर येथील हवामान केंद्रामध्ये १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मार्च महिन्याच्या किमान सरासरी तापमानापेक्षा ते ४ अंशांनी कमी आहे. महाबळेश्वर हे दऱ्याखोऱ्यांनी आणि जंगलांनी व्यापलेला प्रदेश आहे. पाणी असलेल्या ठिकाणी तापमान कमी होणे शक्य आहे. मात्र तीन अंशांपर्यंत तापमान कमी झाल्याची नोंद हवामान विभागाकडे नाही.
- डाॅ. के. एस. होसळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, विभागीय हवामान केंद्र, मुंबई.
महाबळेश्वर, जि. सातारा ः राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली असतानाच महाबळेश्वरमध्ये मात्र सध्या अल्हाददायक वातावरण अनुभवावयास येत आहे. येथील वेण्णालेक ते लिंगमाळा परिसरात शुक्रवारी (ता. २३) पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरी शुभ्र चादर शेतशिवारसह स्ट्रॉबेरी मळ्यामध्ये पाहावयास मिळाली. या परिसरात ४ ते ५ अंश डिग्री पारा खाली उतरला होता.
महाबळेश्वर येथे गेल्या काही दिवसांपासून सकाळ व रात्रीचे वातावरण अत्यंत अाल्हाददायक होते. शुक्रवारी (ता. २३) सकाळी तर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात पहाटे प्रचंड थंडी होती. तेथील तापमान ४-५ अंश डिग्रीपर्यंत खाली उतरले होते. त्यामुळे सर्वत्र या परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत, पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पांघरल्याचे पहावयास मिळाले.
हिवाळ्यात अशा प्रकारे हिमकण पहावयास मिळत असतात, मात्र उन्हाळी हंगामाच्या सुरवातीलाच अशा प्रकारे हिमकण दिसले आहेत. या वर्षी थंडीच्या मोसमामध्ये या नंदनवनात अनेक वेळा कडाक्याची थंडी पडली होती.
मात्र त्या वेळेस जोरात वारेही होते, त्यामुळे हिमकण पहावयास मिळाले नाहीत. मात्र आज ऐन उन्हाळ्यात सुरवातीलाच अशा प्रकारे हिमकण दिसल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्वर शहराचे किमान तापमान सुमारे १०.० डिग्री सेल्सिअस होते, तर वेण्णा तलाव परिसरात ते ४ ते ५ अंश डिग्रीपेक्षा कमी असल्याचे जाणवत होते. दरम्यान ४ मार्च २०१५ रोजी व मागील वर्षी १३ मार्च २०१७ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण साजरा होत असतानाच अशा प्रकाचे हिमकण महाबळेश्वरमध्ये पहावयास मिळाले होते.
- 1 of 289
- ››