Agriculture News in Marathi, low water level in yeldari, Isapur Dam, Maharashtra | Agrowon

येलदरी, इसापूर धरणांत उपयुक्त पाणीसाठा कमीच
माणिक रासवे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

परभणी ः यंदा येलदरी आणि इसापूर धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत निम्मादेखील उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.

परभणी ः यंदा येलदरी आणि इसापूर धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत निम्मादेखील उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.

दरम्यान, रविवारी (ता. २२) पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये २,१७०.९३५ दक्षलक्ष घनमीटर (१०० टक्के), माजलगाव धरणामध्ये ३०८.८० दक्षलक्ष घनमीटर (९८.९० टक्के), येलदरी धरणामध्ये १०९.९४८ दक्षलक्ष घनमीटर (१३.५८ टक्के), सिद्धेश्वरमध्ये ४७.५३५ दक्षलक्ष घनमीटर (५८.७१ टक्के), इसापूर धरणामध्ये (१४.४० टक्के), निम्न दुधना धरणामध्ये १९०.४४० दक्षलक्ष घनमीटर (७८.६२ टक्के), करपरा मध्यम प्रकल्पामध्ये १९.२०३ दक्षलक्ष घनमीटर ७७ टक्के), मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये ७.६८० दक्षलक्ष घनमीटर (२८ टक्के) उपलब्ध झाला होता.

गतवर्षी यावेळी जायकवाडी धरणामध्ये ८२.१७ टक्के, येलदरीमध्ये ३०.९३ टक्के, सिद्धेश्वर धरणामध्ये ७४.३९ टक्के, करपरा आणि मासोळी मध्यम प्रकल्प १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. या धरणातून रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणी आवर्तने सोडण्यात आली होती.

यंदा जायकवाडी, माजलगाव, निम्न दुधना ही मोठी धरणे तसेच करपरा मध्यम प्रकल्पामध्ये देखील पाणी आवर्तन सोडण्याएवढा उपयुक्त पाणीसाठा जमा झालेला आहे. सिद्धेश्वरमध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. परंतु त्यावरील येलदरी धरण अद्याप भरलेले नाही.

सिद्धेश्वरमधील पाणीसाठ्यावर संरक्षित पाणी आवर्तन मिळू शकेल; परंतु येलदरी, इसापूर या धरणातील पाणीसाठा १५ टक्के पेक्षा कमी तर मासोळीतील पाणीसाठा ३० टक्के पेक्षा कमी आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे या धरणाच्या लाभ क्षेत्रातील हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पाळ्या मिळण्याची शक्यता कमी अाहे.

अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होणार
परभणी जिल्ह्यातील २२ पैकी ७ लघू तलावांतील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ न झाल्यामुळेदेखील सिंचनासाठी ताे उपलब्ध होऊ शकणार नाही, अशी स्थिती अाहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

दरम्यान, गेल्या आठवडाभरात येलदरी, सिद्धेश्वर माजलगाव, इसापूर या धरणांमध्ये तसेच काही लघू प्रकल्पांमध्ये किंचित वाढ झाली आहे. करपरा आणि मासोळी मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा स्थिर आहे.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...