agriculture news in marathi, Lower reserves in the dam in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठा
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. वीजनिर्मितीत महत्त्वाच्या कोयना धरणात १२.२१ टीएमसी कमी पाणीसाठा आहे. यामुळे कोयनासह इतर धरणांतील पाण्याचे नियोजन काटकसरीने करावे लागणार आहे. 

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. वीजनिर्मितीत महत्त्वाच्या कोयना धरणात १२.२१ टीएमसी कमी पाणीसाठा आहे. यामुळे कोयनासह इतर धरणांतील पाण्याचे नियोजन काटकसरीने करावे लागणार आहे. 

जुलै व ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणातील पाणीपातळी निश्‍चित होत असते. या दोन्ही महिन्यांत दमदार पाऊस झाल्याने सर्वच धरणे भरून पाणी सोडावे लागले होते. मात्र, दुष्काळी तालुक्यात पावसाची वक्रदुष्टी झाल्याने पाण्याची टंचाई भीषण होत गेली. यामुळे पाण्यासाठी टँकरची वाट बघावी लागत आहे. नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाई भासू लागल्याने अनेक धरणांतील पाणी दुष्काळी तालुक्यांत सोडावे लागले आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी आहे.

वीजनिर्मिती; तसेच जलसिंचनासाठी कोयना धरण महत्त्वाचे असून, या धरणात गतवर्षी या कालावधीत ९६.०२ टीएमसी पाणीसाठा होता. या वर्षी या धरणात ८३.८१ टीएमसी पाणीसाठा आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांत सध्या उरमोडी धरणातून पाणी सोडले जात आहे. तेथेही ३.०१ टीएमसी कमी पाणीसाठा दिसत आहे. धोम धरणातही तशीच परिस्थिती आहे. या धरणात १.८४ टीएमसी कमी पाणीसाठा आहे.

धोम-बलकवडी धरणात १.०७ टीएमसी, कण्हेर धरणात ०.७१ टीएमसी, तारळी धरणात ०.२ टीएमसी कमी पाणीसाठा आहे. सध्या कोयना धरणात ७९.६३, धोम धरणात ६९.२२, उरमोडीत ६५.१६, कण्हेरमध्ये ८१.७३, धोम-बलकवडीत ७३.१०, तारळी धरणात ७९.९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अजून जवळपास पुढील सहा महिने लक्षात घेऊन पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे, अथवा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...