बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रे

बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रे
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रे

सांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज तालुक्याच्या पूर्व भागात बेदाणानिर्मिती केला जातो. याच शेडमध्ये आता यांत्रिकीरणाचा वापर होऊ लागल्याने जिल्ह्यात सुमारे २० ते २५ यंत्रे बेदाणा शेडवर बसली आहेत. यामुळे बेदाण्याची प्रतवारी, ग्रिडिंग करणे सोपे झाले आहे. मजुरांद्वारे हे काम चार ते पाच दिवस लागायचे ते आता केवळ दोन दिवसांत काम पूर्ण होऊ लागले आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ लागला आहे.

सांगली जिल्ह्यात सुमारे सहा हजारांहून अधिक बेदाणानिर्मितीचे शेड आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात कोरडे वातावरण असल्याने या भागात दर्जेदार बेदाणा तयार होतो. यामुळे जिल्ह्यातील बेदाणा उत्पादक शेतकरी बेदाणा तयार करण्यासाठी कवठेमहांकाळ तालुक्यात जातात. बेदाण्याच्या प्रतवारीनुसार दर ठरतात. बेदाणानिर्मिती झाल्यानंतर त्याची प्रतवारी, बेदाणा स्वच्छ करणे ही मुख्य कामे आहेत. आजही ही कामे मजुरांद्वारे केली जातात. त्यामुळे ही प्रक्रिया करण्यासाठी विलंब लागत आहे. दरवर्षी कुशल मजुरांची टंचाई भासते. कधी मजूर वेळेत येत नाहीत. त्यामुळे बेदाणा प्रतवारी आणि स्वच्छ करण्यास वेळ लागतो. तसेच योग्य प्रतवारी आणि स्वच्छ बेदाणा झाला नाही, तर त्याचा परिणाम दरावर होतो.

बेदाणा शेडवर यांत्रिकीरणास सुरवात केली आहे. यामुळे बेदाणा प्रतवारी, स्वच्छ होत असल्याने वेळेची बचत झाली. तसेच चांगली प्रतवारी आणि स्वच्छ झाल्याने दरही चांगला मिळले. - सुनील माळी,   नागज, बेदाणा शेडमालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com