agriculture news in marathi, madhya pradesh announces 500 rupees per quintal for soybean, Maharashtra | Agrowon

मध्य प्रदेशकडून सोयाबीनला ५०० रुपये बोनस
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली ः सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश महत्त्वाचे राज्य आहे. येथे शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. राज्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मध्य प्रदेश सरकार हमीभावावर ५०० रुपये बोनस देणार आहे. केंद्राने २०१८-१९च्या खरिप हंगामात सोयाबीनसाठी ३३९९ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोनससह शेतकऱ्यांना ३८९९ रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार आहे. 

नवी दिल्ली ः सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश महत्त्वाचे राज्य आहे. येथे शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. राज्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मध्य प्रदेश सरकार हमीभावावर ५०० रुपये बोनस देणार आहे. केंद्राने २०१८-१९च्या खरिप हंगामात सोयाबीनसाठी ३३९९ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोनससह शेतकऱ्यांना ३८९९ रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार आहे. 

देशात सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश राज्य अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१८-१९ च्या हंगामात सोयाबीन उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे. यंदा उत्पादनात २६.५ टक्के वाढ होऊन विक्रमी ६७.३ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी राज्यासह देशातील सोयाबीन उत्पादकांना हमीभाव मिळाला नव्हता. राज्याच्या विधानसभेची निवडणुक तोंडावर आली तसेच २०१९ च्या मध्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने २०१८-१९ च्या हंगामात तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे. 

केंद्राने यंदाच्या हंगामात ३३९९ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव सोयाबीनसाठी जाहिर केला आहे. गेल्या वर्षी ३०५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव होता. राज्य सरकारने आता सोयाबीन उत्पादकांसाठी हमीभावावर ५०० रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहिर केला आहे. मध्य प्रदेश सरकारने यंदा केवळ तेलबियांसाठीच भावांतर भुगतान योजना जाहीर केली आहे. राज्यात सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असून आवक सुरू आहे. सध्या शेतकरी आर्द्रता कमी करण्यासाठी सोयाबीन वाळवणीच्या कामात व्यग्र आहेत.

असा मिळणार लाभ
ज्या शेतकऱ्यांनी भावांतर भुगतान योजना किंवा मुख्यमंत्री कृषिक समृद्धी योजनेत नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनसचा लाभ मिळणार आहे. बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना भावांतर भुगतान योजनेअंतर्गत सोयाबीन विकला आणि ज्या शेतकऱ्यांनी हमीभावाने सरकारी संस्थांना माल विकला त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.  

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...