दर फरकातील भरपाई  शिवराज सरकार देणार
दर फरकातील भरपाई शिवराज सरकार देणार

दर फरकातील भरपाई शिवराज सरकार देणार

नवी दिल्ली : शेतीमालास निश्‍चित असे दर मिळावेत, यासाठी मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान सरकारने  किमतीतील फरक भरपाईच्या योजनेस (प्राइस डिफिसिट मेकॅनिझम) मंजूरी दिली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच योजना असून, ती प्रायोगिक स्वरूपात आठ पिकांसाठी राबविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  मध्य प्रदेशात गेल्या काही महिन्यांपूर्वी शेतकरी आत्महत्या आणि घसरलेल्या दरांमुळे मोठे शेतकरी आंदोलन झाले. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना रास्त दर मिळावेत, यासाठी ही योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने चालू आठवड्यात मंजुरी दिली आहे.  सरासरी दर (मोडल प्राईस) हे केंद्र आणि राज्य सरकार चांगल्या प्रतिच्या आवक झालेल्या शेतीमालाचे किमान आणि कमाल किमतीतील सर्वसाधारण दर असतात. अशी आहे योजना या योजनेअंतर्गत सरासरी दर (सर्वसाधारण भाव) हे जर किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) खाली आले तर या दोन दरातील रकमेच्या फरकाची भरपाई राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार आहे. प्रथमतः ही योजना सोयाबीन, भुईमूग, तीळ, रामतीळ, मका, मूग, उडीद आणि तूर या आठ पिकांना लागू राहणार आहे. 

संकेतस्थळावर नोंदणी आवश्‍यक या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. या तारखेपर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दर फरकातील भरपाईचा लाभ मिळणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com