agriculture news in Marathi, Madi festival starts from today, Maharashtra | Agrowon

मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

नगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला व गडाच्या कळसाला कैकाडी समाजाची मानाची काठी टेकवल्यानंतर भटक्‍यांच्या पंढरीतील मढी यात्रेला सुरवात होते. होळी पेटविण्याचा मान गोपाळ समाजाला असतो. यात्रेला बुधवारी (ता. २०) सुरवात होत आहे. होळीच्या दिवशी कैकाडी समाजाचे मानकरी नारायणबाबा जाधव व नाथभक्त पाथर्डीतून कानिफनाथांची मानाची काठी वाजतगाजत मढीला पायी नेतात. 

नगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला व गडाच्या कळसाला कैकाडी समाजाची मानाची काठी टेकवल्यानंतर भटक्‍यांच्या पंढरीतील मढी यात्रेला सुरवात होते. होळी पेटविण्याचा मान गोपाळ समाजाला असतो. यात्रेला बुधवारी (ता. २०) सुरवात होत आहे. होळीच्या दिवशी कैकाडी समाजाचे मानकरी नारायणबाबा जाधव व नाथभक्त पाथर्डीतून कानिफनाथांची मानाची काठी वाजतगाजत मढीला पायी नेतात. 

मढी येथे कैकाडी समाजबांधवांचा देवस्थानातर्फे गौरव करण्यात येतो. गडाच्या कळसाला काठी टेकविल्यानंतर यात्रेला प्रारंभ होतो. होळी ते गुढीपाडवा, असा पंधरा दिवस यात्रोत्सव चालतो. संत कानिफनाथांच्या समाधीचा दिन (रंगपंचमी) यात्रेचा प्रमुख दिवस समजला जातो. भटक्‍या समाजातील विविध जातिधर्मांचे लोक येथे येतात. आता जातपंचायती बंद झाल्या. वैदू, गोपाळ, जोशी, कोल्हाटी, कैकाडी, रंगारी व विविध भटक्‍या समाजाचे हे प्रमुख श्रद्धास्थान आहे. यात्रेला राज्यभरातून व आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणातून नाथभक्त मढीत येतात. मरकड व ग्रामस्थांना पूजेचा मान आहे. 

प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे. एसटी, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, पंचायत समिती, आरोग्य विभागांना दिलेल्या कामांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी तहसीलदार, पोलिस निरीक्षक व देवस्थान समितीचे सर्व विश्वस्त त्यांना मदतीचा हात देणार आहेत. एकेरी वाहतूक, पिण्याचे पाणी, पोलिस बंदोबस्त यांचे नियोजन केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...