agriculture news in marathi, mafsu interview | Agrowon

माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचित
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाद्वारे (माफसू) बुधवारी (ता. १७) झालेल्या भरतीसाठी चुकीने मुलाखतपत्र पाठविले गेल्याने एक उमेदवार मुलाखतीपासून वंचित राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
  दरम्यान, या प्रकरणी लिपीकाच्या चुकीमुळे शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यक्तीला कॉल गेला. संबंधित उमेदवाराचे शिक्षण हे जनरल विषयात होते. ते मेडिसीन विषयात असण्याची गरज होती, असे स्पष्टीकरण माफसू तर्फे देण्यात आले.​

नागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाद्वारे (माफसू) बुधवारी (ता. १७) झालेल्या भरतीसाठी चुकीने मुलाखतपत्र पाठविले गेल्याने एक उमेदवार मुलाखतीपासून वंचित राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
  दरम्यान, या प्रकरणी लिपीकाच्या चुकीमुळे शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यक्तीला कॉल गेला. संबंधित उमेदवाराचे शिक्षण हे जनरल विषयात होते. ते मेडिसीन विषयात असण्याची गरज होती, असे स्पष्टीकरण माफसू तर्फे देण्यात आले.​

वनविभागाअंतर्गत गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे. या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या उपचाराची जबाबदारी माफसूवर सोपविण्यात आली आहे. त्याकरिता माफसूद्वारे पदाची भरती करण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार बुधवारी (ता. १७) मुलाखतीचा कार्यक्रम ठरला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूम तालुक्‍यातील जटाळा येथील दत्तात्रय किसन इंगोले यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. विषयतज्ज्ञ (पशुवैद्यक औषध) या पदाकरिता त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. इतर सर्वांची मुलाखत प्रक्रिया पार पडली. परंतु वेळ संपल्यावरही दत्तात्रय इंगोले यांना मात्र मुलाखतीसाठी निवड समितीसमोर जाण्याची संधी देण्यात आली नाही. याबाबत माफसू प्रशासनाकडे विचारणा केल्यावर त्यांना धक्‍काच बसला. चुकीने मुलाखतपत्र तुम्हाला पोचले, असे कारण त्यांना सांगण्यात आले.

"लिपीकाच्या चुकीमुळे शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यक्तीला कॉल गेला. परंतू निवड प्रक्रिया पारदर्शी झाली आहे. निवड समिती कडून ती प्रभावीपणे राबविली गेली. संबंधित उमेदवाराचे शिक्षण हे जनरल विषयात होते. ते मेडिसीन विषयात असण्याची गरज होती. माफसुच्या कारभारात सुधारणांसाठी पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारामुळे त्याला खिळ बसते. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे."
- अनुपकूमार
प्रभारी कुलगूरु माफसू

विभागीय आयुक्त, नागपूर

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...