agriculture news in Marathi, MAFSU vice-chancelar selection process | Agrowon

‘माफसू’ची कुलगुरू निवड प्रक्रिया लांबणीवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

नागपूर ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी पाच जणांची शॉर्टलिस्ट करीत ती राज्यपालांना पाठविली जाणार होती. रविवारी (ता. ३) ही प्रक्रिया पार पाडण्याचे प्रस्तावीत असताना, ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

नागपूर ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी पाच जणांची शॉर्टलिस्ट करीत ती राज्यपालांना पाठविली जाणार होती. रविवारी (ता. ३) ही प्रक्रिया पार पाडण्याचे प्रस्तावीत असताना, ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कुलगुरू विदर्भाचा निवडण्यात आला. त्यांनतर आता माफसूकरीतादेखील विदर्भातीलच व्यक्‍ती कुलगुरू असावा, यासाठीच्या घडामोडींना वेग आल्याचे सूत्रे सांगतात. ३ डिसेंबर रोजी १५ उमेदवारांमधून पाच जणांची शॉर्टलिस्ट करून राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्याचे प्रस्तावीत होते. त्याकरीता १५ उमेदवारांना ई-मेलद्वारे रविवारी (ता. ३) मुंबईत राहण्याच्या सूचना होत्या. परंतु एेनवेळी ही प्रक्रिया रद्दबातल ठरविण्यात आली. लवकरच नवी तारीख या उमेदवारांना कळविली जाणार आहे. परंतु ही प्रक्रिया का रद्दबातल ठरविली गेली यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. 

दहा तारखेच्या आधी होणार प्रक्रिया
समिती सदस्यांपैकी एकाच्या सासऱ्याचे निधन झाले. त्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कुलगुरू निवड समितीमधील सदस्य व पशुसंवर्धन व दुग्धविकास सचिव विकास देशमुख हे ३० डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्याआधी कुलगुरू निवडीची प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. अन्यथा त्याकरिता नवी निवड समिती स्थापन करावी लागणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव...सोलापूर  : आषाढी सोहळ्यातील शासकीय...
लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडतराहुरी, जि. नगर : चिंचविहिरे येथे कृषी विभागाच्या...
तालुका कृषी कार्यालयाचा कारभार हाकतात...गडचिरोली ः दुर्गम, आदिवासीप्रवण भागात कृषी...
देशातील जलाशयांमध्ये ३२ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या ९१ जलशयांमध्ये...
विदर्भात अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या...
आज आषाढी एकादशीपंढरपूर :  त्रिविध तापांची झाली बोळवण ।...
शासकीय महापूजेला मुख्यमंत्री जाणार नाहीतपुणे - आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना...
तेल्हारा तालुक्यात बीटीवर बोंड अळीअकोला ः यंदाच्या हंगामात प्री-मॉन्सून लागवड...
साखरेसाठी दुहेरी दर योजना अव्यवहार्यनवी दिल्ली ः साखरेचे दर घसरल्याने उद्योगात वापर...
आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद लातूर  : पेरणीचे सूक्ष्म नियोजन व अचूक संकलन...
पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे...
बनावट संवर्धके, कीटकनाशकांचा २९ लाखांचा...परभणी: विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके (...
दूध दराबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारकपुणे  ः दूधदरप्रश्‍नी शासनाने जाहीर केलेल्या...
पुणे दूध संघाला ‘एनडीडीबी’चे मानांकनपुणे ः भेसळयुक्त दूध विक्रीला आळा घालण्यासाठी...
पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर...भाग गेला, शीण गेला । अवघा झाला आनंद ।। ...
शेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...
बचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...
दूध दरवाढ निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत...कोल्हापूर: दूध संघांनी गायीच्या दुधास २५ रुपये...
विदर्भ, मराठवाडा विकासासाठी २२ हजार...नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०...