agriculture news in marathi, MAFSU Vice-Chancellor | Agrowon

‘माफसू’ला कुलगुरू देता का हो कुलगुरू...
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

नागपूर : गेल्या चार महिन्यांपासून रखडलेली ‘माफसू’ (महाराष्ट्र पशू मत्स्य व विज्ञान विद्यापीठ) ची कुलगुरू निवड प्रक्रिया राज्यपालांकडून मुलाखती आटोपल्यानंतरही पुढे सरकली नाही. परिणामी या प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेपांविषयी शंका कुशंकांना उत आला आहे.

नागपूर : गेल्या चार महिन्यांपासून रखडलेली ‘माफसू’ (महाराष्ट्र पशू मत्स्य व विज्ञान विद्यापीठ) ची कुलगुरू निवड प्रक्रिया राज्यपालांकडून मुलाखती आटोपल्यानंतरही पुढे सरकली नाही. परिणामी या प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेपांविषयी शंका कुशंकांना उत आला आहे.

महाराष्ट्र पशू मत्स्य व विज्ञान विद्यापीठ हे भरती प्रक्रिया आणि इतर कारणांमुळेच आधीपासून चर्चेत राहिले आहे. या विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपुष्टात आला होता. त्यानंतर नव्या कुलगुरूच्या निवडीसाठीची प्रक्रिया चार महिने रखडत ठेवण्यात आली. सुरवातीला 11 व्यक्‍तींना या पदासाठी पात्र ठरविण्यात आले. त्यात आणखी काही नावे घुसविण्याकरिता ही प्रक्रिया रखडत ठेवल्या गेली; अशी चर्चा होत होती. या चर्चांना पूर्णविराम देत तब्बल चार महिन्यांनी २४ डिसेंबरला निवड समितीने सुरवातीच्याच केवळ 11 जणांनाच मुलाखतीकरिता बोलावले. या अकरा जणांमधून पाच जणांच्या नावांची शिफारस केली. या पाच जणांना 26 डिसेंबर रोजी राज्यपालांकडून मुलाखतीचे निमंत्रण आले. त्यांच्या समोरदेखील मुलाखती आटोपल्यानंतर दोन दिवसांचा कालावधी लोटला आहे. परंतु, नव्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा अद्यापही करण्यात आली नाही.

लवकरच घोषणा?
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांना दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून पदावरून काढण्यात आले होते. पुन्हा असा प्रकार होऊ नये याकरिता राज्यपाल कार्यालयाकडून काळजी घेतली जात असल्याचे वृत्त आहे. त्याकरिताच उमेदवारांच्या नावाची घोषणा विलंबाने होत असल्याचे सांगीतले जात आहे. काहींनी मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे ही नियुक्‍ती रखडल्याचे सांगीतले. येत्या दोन ते तीन दिवसांत ही घोषणा होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री...
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...