agriculture news in marathi, MAFSU, Vice-Chancellor, interview | Agrowon

‘माफसू’ची भरती प्रक्रिया कुलगुरूविनाच?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

नागपूर : माफसूची जानेवारी महिन्यात होणारी भरती प्रक्रिया कुलगुरूविनाच होण्याची शक्यता आहे. नव्या कुलगुरूच्या घोषणेबाबत वेळकाढू धोरण अवलंबिण्यात आले आहे. यामुळे प्रभारींच्या भरवशावर होणारी ही भरती पारदर्शी होईल किंवा नाही याबाबत साशंकता आहे.

नागपूर : माफसूची जानेवारी महिन्यात होणारी भरती प्रक्रिया कुलगुरूविनाच होण्याची शक्यता आहे. नव्या कुलगुरूच्या घोषणेबाबत वेळकाढू धोरण अवलंबिण्यात आले आहे. यामुळे प्रभारींच्या भरवशावर होणारी ही भरती पारदर्शी होईल किंवा नाही याबाबत साशंकता आहे.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे. या प्राणिसंग्रहालयातील जनावरांच्या आरोग्याची काळजी माफसू घेणार आहे. त्याकरिता आवश्‍यक पदनिर्मिती व भरतीला शासनाने तत्कालीन कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांच्या कार्यकाळातच मान्यता दिली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये डॉ. मिश्रा यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. तेव्हापासून ही भरती प्रक्रिया पुढे सरकली नाही.

आता विद्यापीठाचा कारभार नागपूर विभागीय आयुक्‍त अनुपकुमार प्रभारी कुलगुरू म्हणून पाहत आहेत. असे असताना त्यांच्याच कार्यकाळात गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाकरिताची भरती प्रक्रिया राबविण्याचा घाट घालण्यात आला आहे. या माध्यमातून सहा सहायक प्राध्यापकांची पदे भरली जाणार आहेत. त्याकरिता 15 व 16 जानेवारीला भरतीची प्रक्रिया होईल. त्याकरिता आवश्‍यक मुलाखतपत्रदेखील उमेदवारांना पोचली आहेत. निवड समितीचे चेअरमन कुलगुरू राहतात. परंतु सद्यःस्थितीत माफसूला कुलगुरूच नाहीत.

इतर ताज्या घडामोडी
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
सरकार कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून...
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...