agriculture news in Marathi, MAFSU vice chancellor selection process will be held on 24 th December, Maharashtra | Agrowon

‘माफसू’ची कुलगरू निवड प्रक्रिया २४ डिसेंबरला
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 डिसेंबर 2017

नागपूर ः महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकरीता नव्या कुलगुरुची निवड प्रक्रिया आता २४ डिसेंबर रोजी होणार आहे. २४ डिसेंबर रोजी निवड समितीकडून मुलाखती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (ता. २५) यातील पाच जणांच्या मुलाखतीची प्रक्रिया राज्यपालांसमोर पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळपर्यंत कुलगुरूचे नाव जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगीतले. 

नागपूर ः महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकरीता नव्या कुलगुरुची निवड प्रक्रिया आता २४ डिसेंबर रोजी होणार आहे. २४ डिसेंबर रोजी निवड समितीकडून मुलाखती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (ता. २५) यातील पाच जणांच्या मुलाखतीची प्रक्रिया राज्यपालांसमोर पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळपर्यंत कुलगुरूचे नाव जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगीतले. 

राज्याचा आवाका असलेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकरिता कुलगुरू निवडीची प्रक्रिया रहस्यमय टप्प्यातून जात आहे. सप्टेंबर महिन्यातच या विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर नव्या कुलगुरूच्या निवडीसाठीच्या हालचालींना वेग आला. परंतु तीन महिन्यांत ही प्रक्रिया पुढे सरकलीच नाही. त्यामागे विदर्भातील व्यक्‍ती या पदावर असावा असा अट्टहास हे कारण असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळेच तीन डिसेंबरला होणाऱ्या प्रक्रियेकरिता १५ जणांना निवड समितीने मुलाखतीकरिता ईमेलच्या माध्यमातून पाचारण केले होते. 

मात्र, एेनवेळी ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे उमेदवारांना कळविण्यात आले. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी ही निवड प्रक्रिया होणार असल्याचा ई-मेल उमेदवारांना मिळाला. त्यानुसार उमेदवार पुन्हा तयारीला लागले. मात्र ११ डिसेंबरचा मुहूर्त देखील टळला असून आता या प्रक्रियेकरिता २४ डिसेंबरची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. २४ डिसेंबरला उमेदवारांनी निवड  समितीसमोर सादरीकरण करावे. त्यातील पाच जणांची नावे अंतिम करून ती राज्यपालांना पाठविली जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तडकाफडकी राज्यपाल देखील या पाच जणांच्या मुलाखती घेऊन सायंकाळपर्यंत कुलगुरूच्या नावावर शिक्‍कामोर्तब करतील, असे सूत्र सांगतात. 

दोन उमेदवारांमध्ये झाली वाढ
पूर्वी कुलगुरू पदासाठी इच्छुकांच्या यादीत केवळ १५ जणांचा समावेश होता. ३ डिसेंबरपर्यंत १५ जणांच्या नावाची चर्चा असताना आता १७ जणांची नावे असल्याचे सूत्र सांगतात. त्यामुळे एेनवेळी कोणाची आणि कशी नावे वाढली याविषयी गूढ वाढीस लागले आहे.

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...