agriculture news in marathi, Mafsu Vice Chancellor today will decide | Agrowon

माफसूचे कुलगुरू आज ठरणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीला मुहूर्त मिळाला असून मंगळवारी (ता.२६) नव्या कुलगुरूची घोषणा राज्यपाल कार्यालयाकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीला मुहूर्त मिळाला असून मंगळवारी (ता.२६) नव्या कुलगुरूची घोषणा राज्यपाल कार्यालयाकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संशोधनात्मक उपलब्धीऐवजी अनेक घोटाळे नावे असलेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१७ मध्ये संपुष्टात आला होता. तेव्हापासून प्रभारी कुलगुरू म्हणून नागपूर विभागीय आयुक्‍त अनुपकुमार काम पाहात होते. नव्या कुलगुरूच्या निवडीसाठी वारंवार निवड समितीकडून तारीख पे तारीख देण्यात आली. निवड समितीकडून असा वेळकाढूपणा होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एेनवेळी काही जणांची नावे यादीत घुसविण्याकरिता हा प्रकार चालविल्याची चर्चाही रंगली होती.

यातील एक होईल कुलगुरू
बिकानेर (राजस्थानी) येथील राष्ट्रीय उंट संशोधन संस्थेचे संचालक एन. ए. पाटील (अकोला), माफसूचे विद्यमान कार्यकारी परिषद सदस्य व नागपूरचे रहिवासी व्ही. व्ही. कुळकर्णी, डॉ. आशिष पातूरकर (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता), हैदराबाद येथील कुक्‍कुटशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. रेड्डी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. जयप्रकाश या पाच जणांच्या नावांची शिफारस निवड समितीने राज्यपालांकडे केली आहे. मंगळवारी (ता.२६) राज्यपाल या पाच जणांच्या मुलाखती घेत कुलगुरूचे नाव जाहीर करतील.

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...