agriculture news in marathi, Mafsula will get globally popularity | Agrowon

माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून देणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने विद्यापीठासमोर आहेत. त्या आव्हानांवर सर्वांच्या सहकार्याने मात करीत विद्यापीठाला जागतीक स्तरावर लौकीक मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी दिली.

प्रभारी कुलगूरू तसेच नागपूर विभागीय आयुक्‍त अनुपकूमार यांच्याकडून त्यांनी सोमवारी (ता.२२) पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने विद्यापीठासमोर आहेत. त्या आव्हानांवर सर्वांच्या सहकार्याने मात करीत विद्यापीठाला जागतीक स्तरावर लौकीक मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी दिली.

प्रभारी कुलगूरू तसेच नागपूर विभागीय आयुक्‍त अनुपकूमार यांच्याकडून त्यांनी सोमवारी (ता.२२) पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

समाजातील प्रत्येक घटकापर्यंत माफसूची सकारात्मक प्रतिमा गेली पाहिजे. त्याकरीता सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे. राज्यातील सर्व पशुपालकांपर्यंत विद्यापीठ निर्मित आधुनिक तंत्रज्ञान येत्या काळात नक्‍की पोचेल, असेही ते म्हणाले. प्रभारी कुलगुरू अनुपकूमार यांनी सुध्दा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विद्यापीठाचे कार्य पोचणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यापीठाचे कार्य शिक्षणापूरतेच मर्यादीत न राहता संशोधन आणि त्याच्या विस्तार कार्यावर देखील भर देणे क्रमप्राप्त असल्याचे अनुपकुमार म्हणाले. देशी गाईचे संगोपन व संरक्षण करून उत्पादकता वाढविणे गरजेचे असून सदरच्या प्रकल्पाबाबत मी स्वतः यापुढे पाठपुरावा करून सर्व प्रकारची मदत विद्यापीठास करण्याबाबत सदैव तत्पर राहणार असल्याचे ते म्हणाले.

या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचे उत्पन्न वाढविण्यास सहाय्य होणार आहे. यावेळी संशोधन संचालक डॉ. ए.एस. बन्नाळीकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. ए.पी. सोमकुंवर, अधिष्ठाता निम्न शिक्षण डॉ. एन.एन. झाडे, कुलसचिव एन.के. लोणकर, नियंत्रक डी.बी. राऊत, विद्यापीठ अभियंता व्ही.सी. वैद्य, विद्यापीठ ग्रंथपाल एस.एन. गावंडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...