अविकसित भागांत गुंतवणुकीमुळे रोजगाराला चालना ः मुख्यमंत्री

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स २०१८ च्या माध्यमातून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपये गुंतवणुकीचे ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून ३६ लाख ७७ हजार १८५ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन २०१८ जागतिक गुंतवणूक परिषदेचा समारोप झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी रिलायन्स उद्योग समूहाबरोबर ६० हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या तसेच राज्य शासन व भारतीय रेल्वे यांच्या समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच ''सहभाग'' या वेबपोर्टलचे उद्‍घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मॅग्नेटिक महाराष्ट्राला प्रचंड यश मिळाले आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या यशस्वीतेविषयी मुख्यमंत्री म्हणाले, एकूण ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी ८ प्रस्ताव असून १० हजार २७८ कोटी गुंतवणूक होणार आहे.

रेल्वेसोबत झालेल्या ६०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे लातूर येथे सुमारे ३५० एकर जागेवर रेल्वे कोच निर्मिती कारखाना पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या भागात १५ हजार जणांना थेट रोजगार मिळणार आहे. तर त्याच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प एकूण २ हजार हेक्टर जागेवर तयार करण्यात येणार आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. केंद्र शासनाने २००४ ते २०१४ या पाच वर्षांत ५ हजार ८५७ कोटी रुपये रेल्वे विकासासाठी महाराष्ट्रात गुंतविले होते. मात्र, त्यानंतर आतापर्यंत २४ हजार ४०० कोटी रुपये महाराष्ट्रासाठी देण्यात आले आहेत.

कृषी व विपणन क्षेत्रातील प्रकल्प     -  जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने हवामान आधारित कृषी प्रकल्प : ४ हजार कोटी     -  आयसीआरआयएसएटी,  हैदराबाद, किसानमित्र : विदर्भातील अकरा जिल्ह्यांत ६६ कोटी गुंतवणूक     -  रॉयल ॲग्रो फूडस् : १४०० कोटी     -     पलासा ॲग्रो : २७०० कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com