agriculture news in marathi, Maha farmers has opportunity to export banana, tomato and vegetables | Agrowon

केळी, टोमॅटो, भाजीपाला अफगाणिस्तानला निर्यातीची संधी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई  : काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुंबई ते काबूल थेट कार्गो सेवेमुळे महाराष्ट्रातील केळी, टोमॅटो आणि हिरवा भाजीपाला अफगाणिस्तानात पाठविला जात आहे. तेथे त्याला मोठी मागणी असून तेथील फळे, सुकामेवादेखील राज्यात उपलब्ध होणार आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

अफगाणिस्तानचे मुंबईतील वाणिज्यदूत मोहंमद झिया सालेही यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. या वेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार उपस्थित होते.

मुंबई  : काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुंबई ते काबूल थेट कार्गो सेवेमुळे महाराष्ट्रातील केळी, टोमॅटो आणि हिरवा भाजीपाला अफगाणिस्तानात पाठविला जात आहे. तेथे त्याला मोठी मागणी असून तेथील फळे, सुकामेवादेखील राज्यात उपलब्ध होणार आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

अफगाणिस्तानचे मुंबईतील वाणिज्यदूत मोहंमद झिया सालेही यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. या वेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार उपस्थित होते.

मुंबई-काबूल थेट कार्गो सेवेमुळे मालाची वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील उत्तम दर्जाच्या फळांना तसेच भाजीपाल्यास अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. राज्यातून टोमॅटो, केळी, भाजीपाला येथून काबूलला पाठविला जात आहे. सध्या आठवड्यातून एकदा कार्गोद्वारे माल पाठविला जात आहे. पहिल्या फेरीत महाराष्ट्रातून ४० टन माल पाठविला त्यात २० टन केळी, १० टन टोमॅटो आणि भाजीपाला होता.

महाराष्ट्रातील शेळी-मेंढीचे मटन, मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ यांना अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या कार्गो सेवेमुळे अफगाणिस्तानामधील फळे, सुकामेवा देखील राज्यात उपलब्ध होणार आहे. वाशी येथील बाजार समितीच्या आवारात अफगाणिस्तानच्या फळे आणि सुकामेव्याच्या दुकानासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कार्गोसेवेचा उपयोग महाराष्ट्रातील भाजीपाला, फळे, मासे, सेंद्रिय शेतीतील उत्पादने रशियामध्ये पाठविण्यासाठी सुद्धा होणार आहे.  तेथील बाजारपेठेत शेतमालास संधी उपलब्ध होणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

अफगाणिस्तानातील शेतकऱ्यांना कुशल शेतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रगिशील शेतकरी, तज्ज्ञ तसेच गुंतवणूकदारांना पाठवावे, अशी मागणी शिष्टमंडळाने या वेळी केली.

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...