agriculture news in marathi, Maha Governor expects collective work in Agriculture research and extention | Agrowon

कृषी संशोधन आणि विस्तार संस्थांनी एकत्र कार्य करावे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सगरोळी, जि. नांदेड : देशातील भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, तसेच इतर कृषी संलग्न यंत्रणा यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कार्य केल्यास यापुढे कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल होऊन, तो देशातील मोठा उद्योग म्हणून पुढे येऊ शकतो, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.

सगरोळी, जि. नांदेड : देशातील भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, तसेच इतर कृषी संलग्न यंत्रणा यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कार्य केल्यास यापुढे कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल होऊन, तो देशातील मोठा उद्योग म्हणून पुढे येऊ शकतो, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.

सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राचे कृषिवेद या प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन सोमवारी (ता. १२) झाले. या वेळी अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, स्वगाताध्यक्ष आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलिस महानिरीक्षक चिंरजीव प्रसाद, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख उपस्थित होते. 

राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, की सतराव्या शतकातले गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी कृषी व्यवसायात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पशुपालन, रेशीम शेती, हस्तकला, मधुमक्षिकापालन, अन्नप्रक्रिया या व्यवसायावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. स्वयंसाह्यता गटाच्या माध्यमातून स्वयं उत्पादक बनून स्वतःचे ब्रँडिंग, पॅकेजिंग व मार्केटिंग करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्रासाठी भरीव काम करण्यास सुरवात केली असून उन्नत शेती, समृद्ध शेतकरी, जमीन आरोग्यपत्रिका, जलयुक्त शिवार अभियान या योजना कृषी क्षेत्रासाठी फलदायी आहेत. 

श्री. बागडे म्हणाले, की निसर्गाचा लहरीपणा व अस्मानी, सुलतानी संकटांमुळे शेती पूर्णतः धोक्यात आली आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रशिक्षण घेऊन नव्या कल्पना आत्मसात कराव्यात असे आवाहन केले. श्री. देशमुख यांनी संस्थेच्या पन्नास वर्षांच्या विश्वासावरच हे कृषी विज्ञान केंद्र उभारले असून, शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे केंद्र यशस्वीरीत्या कार्य करीत असल्याचे सांगितले. राज्यपालांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत कृषिवेद या इमारतीचे उद्‌घाटन झाले.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...