agriculture news in marathi, Mahabeej to bring BT cotton seed from next year | Agrowon

महाबीज देणार पुढील वर्षीच्या हंगामात बीटी बियाणे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018

नागपूर : महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आश्‍वासित केल्याप्रमाणे बीटी वाणांचा पुरवठा २०१९ च्या खरीप हंगामात केला जाईल, अशी माहिती महाबीजने पत्रकातून दिली आहे. महाबीजचे बीटी वाण बोंडअळीने पोखरले या ‘ॲग्रोवन’मधील वृत्तानंतर महाबीजने हा खुलासा केला आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या सहकार्याने महाबीज बीटी वाण बाजारात आणणार आहे. पीकेव्ही हायब्रीड-२ आणि एनएचएच-४४ या वाणांमध्ये बीजी-२ तंत्रज्ञानाचा अंतर्भाव त्याकरीता केला जाईल. महिको मोन्सॅटोसोबत त्याकरिता करार करण्यात आला आहे. 

नागपूर : महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आश्‍वासित केल्याप्रमाणे बीटी वाणांचा पुरवठा २०१९ च्या खरीप हंगामात केला जाईल, अशी माहिती महाबीजने पत्रकातून दिली आहे. महाबीजचे बीटी वाण बोंडअळीने पोखरले या ‘ॲग्रोवन’मधील वृत्तानंतर महाबीजने हा खुलासा केला आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या सहकार्याने महाबीज बीटी वाण बाजारात आणणार आहे. पीकेव्ही हायब्रीड-२ आणि एनएचएच-४४ या वाणांमध्ये बीजी-२ तंत्रज्ञानाचा अंतर्भाव त्याकरीता केला जाईल. महिको मोन्सॅटोसोबत त्याकरिता करार करण्यात आला आहे. 

केंद्रानंतर राज्य शासनाने या दोन्ही वाणांना विपणनाकरिता २७ फेब्रुवारी २०१८ रोजी मान्यता दिली आहे. 
सद्यःस्थितीत हे दोन्ही वाण बीजोत्पादन प्रक्रियेत असून पुढील वर्षी खरीप २०१९ च्या हंगामात शेतकऱ्यांना उपलब्ध केले जातील. तत्पूर्वी गुजरात व कर्नाटक राज्यात प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमातून प्राप्त झालेल्या संकरित बियाण्यांमधून खरीप २०१८ या हंगामात विद्यापीठ व महाबीज स्तरावर दोन्ही वाणांचे पीक प्रात्याक्षिक घेण्यात येणार आहे. बीटी वाण विकसित करण्याकरिता कमीत कमी तीन वर्षांचा कालावधी, त्यानंतर मूलभूत व पायाभूत बियाणे तयार करण्याची प्रक्रिया व त्यानंतर संकरित बीजोत्पादन हा सर्व कालावधी लक्षात घेऊन महाबीज व कृषी विद्यापीठ यांनी या वाणांचे बियाणे खरीप २०१९ या हंगामात शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याबाबत आश्‍वासित केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...