agriculture news in Marathi, MAHABEEj director result on 20 January, Maharashtra | Agrowon

‘महाबीज’ संचालकपदाचा निकाल २० जानेवारीला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जानेवारी 2018

नागपूर ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळावर दोन संचालकपदांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतील मतदानाचा टप्पा शनिवारी (ता. १३) आटोपला. आता उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा असून, २० जानेवारी रोजी विजेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

महाबीजच्या कृषक भागधारकांनी संचालक मंडळावर दोन संचालक निवडून द्यावयाचे असतात. त्याकरिता २७ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ७ डिसेंबरपर्यंत अकोला व उर्वरित मतदारसंघातून सहा नामांकन अर्ज महाबीजकडे प्राप्त झाले होते.

नागपूर ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळावर दोन संचालकपदांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतील मतदानाचा टप्पा शनिवारी (ता. १३) आटोपला. आता उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा असून, २० जानेवारी रोजी विजेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

महाबीजच्या कृषक भागधारकांनी संचालक मंडळावर दोन संचालक निवडून द्यावयाचे असतात. त्याकरिता २७ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ७ डिसेंबरपर्यंत अकोला व उर्वरित मतदारसंघातून सहा नामांकन अर्ज महाबीजकडे प्राप्त झाले होते.

निवडणूक कार्यक्रमानुसार २३ डिसेंबर ते १३ जानेवारीपर्यंत अकोला (विदर्भ विभाग) मतदारसंघ व उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून भागधारकांना मतदानाचा हक्क बजावता येणार होता; परंतु, १४ डिसेंबरपूर्वी उर्वरित महाराष्ट्र संघातून तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बुलडाणा जिल्ह्यातील वल्लभराव तेजराव देशमुख यांची निवड निश्चित झाली होती. त्यामुळे केवळ एक पदासाठी अकोल्याचे संजय धोत्रे व प्रशांत गावंडे यांच्यात लढत होती. त्याकरिता १३ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष तसेच टपाल मतपत्रिकेने मतदान करण्यात आले. मतदानासाठी आज शेवटचा दिवस उरला असून, २० जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

 नऊ जिल्ह्यांतील भागधारकांची मते पेटीबंद
उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव तेजराव देशमुख यांची अविरोध निवड झाली होती. त्यामुळे केवळ अकोला (विदर्भ विभाग) मतदारसंघातील संचालकपदासाठीच्या उमेदवाराची निवड अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, बुलडाणा (खामगाव, नांदुरा) जिल्ह्यांतील २२ हजार ४११ भाग असेलेल्या तीन हजार ४६५ भागधारकांच्या मतांवर अवलंबून होती. टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान झाले अाहे.

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...