agriculture news in marathi, MAHABEEJ provided 90 percent seed in state market | Agrowon

महाबीजचे ९० टक्के बियाणे बाजारात
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 जून 2018

अकोला  : खरिपासाठी महाबीज ५ लाख ९६ हजार क्विंटल बियाणे पुरविणार अाहे. यापैकी ९० टक्के बियाणे राज्यातील बाजारात दाखल झाले अाहेत. उर्वरित बियाणे अाठ दिवसांत पुरविण्यात येईल, अशी माहिती महाबीजचे विपणन महाव्यवस्थापक रामचंद्र नाके यांनी दिली. 

अकोला  : खरिपासाठी महाबीज ५ लाख ९६ हजार क्विंटल बियाणे पुरविणार अाहे. यापैकी ९० टक्के बियाणे राज्यातील बाजारात दाखल झाले अाहेत. उर्वरित बियाणे अाठ दिवसांत पुरविण्यात येईल, अशी माहिती महाबीजचे विपणन महाव्यवस्थापक रामचंद्र नाके यांनी दिली. 

खरिप हंगामासाठी महाबीजने वेगवेगळ्या पिकांचे बियाणे पुरविण्याचे नियोजन केले अाहे. यात तृणधान्य एक लाख चार हजार २७९ क्विंटल, कडधान्य ४० हजार ४१० क्विंटल, गळीतधान्य साडेचार लाख क्विंटल व इतर बियाणे १३४२ क्विंटल असे एकूण पाच लाख ९६ हजार ३२ क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करून देणार अाहे. या बियाण्यांपैकी ९० टक्के बियाणे बाजारात पुरविण्यात अाले अाहे.    

ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत सोयाबीन जेएस ३३५ हे ३० किलो बियाणे बॅग १३५० रुपयांना शेतकऱ्यांना मिळेल. धान एमटीयू १००१, एमटीयू १०१०, अायअार ६४, सुवर्णा या वाणांची २५ किलोची बॅग ४६२.५० रुपयांना तर जेजीएल १७९८ या वाणाची २५ किलोची बॅग  ६८७.५० अाणि कर्जत ३ ही २५ किलोची बॅग ४०० रुपयांना दिली जाईल. हे बियाणे अनुदानित किमतीवर केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये पुरविले जात अाहे. 

बीजोत्पादन योजना
महाबीजच्या वतीने सोयाबीन व धान या पिकांसाठी राज्यात ग्राम बीजोत्पादन योजना राबवली जाणार अाहे. सोयाबीनच्या जेएस ३३५ या वाणासाठी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगला अाणि गडचिरोली, भंडारा व गोंदिया अाणि कोकणातील सर्व जिल्हे वगळून उर्वरित २२ जिल्ह्यांचा समावेश अाहे. तर धानाच्या एमटीयू १०१०, एमटीयू १००१, जेजीएल १७९८, अायअार ६४ व कर्जत ३ या वाणासाठी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली अाणि चंद्रपूर या जिल्ह्यात ग्राम बीजोत्पादन घेतले जाणार अाहे. शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्र मर्यादेत अनुदानावर यासाठी बियाणे दिले जात अाहे. शेतकऱ्यांनी सातबारा व अाधार कार्डची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती घेऊन नजीकच्या कृषी विभाग किंवा महाबीज कार्यालयात संपर्क साधावा. परमीटवर नमूद लोकवाट्याची रक्कम भरून महाबीज विक्रेत्यांकडून अनुदानावर बियाणे प्राप्त करून घ्यावे असेही महाबीजने सूचविले अाहे.    

राज्यात अधिकृत शेतकरी गट व फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांनी उत्पादित केलेले सोयाबीन प्रमाणीत बियाणे उपलब्ध असल्यास ते महाबीज घेणार असून, शेतकऱ्यांना उपलब्ध करून देईल. संबंधित गट, कंपन्यांनी महाबीजच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यास त्या बियाण्यांची पडताळणी केली जील. त्यानंतर त्याचा मोबदला देऊन महाबीज हे बियाणे घेईल. ते शेतकऱ्यांना हंगामासाठी देण्यात येणार अाहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...