‘महाबीज’चे सहा हजार हेक्टरवर बीजोत्पादन

करडई बिजोत्पादन
करडई बिजोत्पादन

परभणी ः रब्बी हंगामामध्ये महाबीजच्या परभणी विभागांत ५ हजार ९२१ हेक्टवर ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार असून, ७० हजार क्विंटल कच्चे बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. हरभऱ्याचे सर्वाधिक ४ हजार २०८ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार असल्याची माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड यांनी दिली. महाबीजच्या परभणी विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये यंदा ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांचा ५ हजार ९२१ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात ज्वारी १०२ हेक्टर, गहू ३०० हेक्टर, हरभरा १,०४८ हेक्टर, करडई ७८ हेक्टर असे एकूण १,५२८ हेक्टर. तसेच हिंगोली जिल्ह्यात ज्वारी ३० हेक्टर, गहू ८०, हरभरा १,०२५, करडई ४०, असे एकूण १,१७५ हेक्टर; नांदेड जिल्ह्यात ज्वारी १४८, गहू ५०, हरभरा १९५, करडई ५५ असे एकूण ४४८ हेक्टर; लातूर जिल्ह्यात ज्वारी १४०, हरभरा ९२५, करडई ८० हेक्टर असे एकूण १,१४५ हेक्टर, उस्मानाबाद जिल्ह्यात ज्वारी १६४, हरभरा ९१५, करडई ५० हेक्टर, असे एकूण १,१२९ हेक्टर; सोलापूर जिल्ह्यात ज्वारी ३३२, हरभरा १००, करडई ६४ हेक्टर असे एकूण ४९६ हेक्टर बीजोत्पादन घेण्यात येणार आहे. हरभऱ्याचे ४ हजार २०८ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार असून, ४९ हजार ९१५ क्विंटल बीजोत्पादन अपेक्षित आहे. ज्वारीचे ९१६ हेक्टरवर ७ हजार ९४७ क्विंटल, गव्हाचे ४३० हेक्टरवर ९ हजार २४५ क्विंटल, करडईचे ३६७ हेक्टरवर २ हजार ५६९ क्विंटल असे ६९ हजार ६७६ क्विंटल कच्चे बियाणे उत्पादन अपेक्षित आहे, असे श्री. गायकवाड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com