agriculture news in marathi, Mahabeej to take 3250 hectare seed program in Nagar District | Agrowon

नगर जिल्ह्यात सव्वातीन हजार हेक्‍टरवर घेतले बिजोत्पादन
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

नगर : नगर जिल्ह्यामध्ये महाबीजतर्फे गहू, ज्वारी, व हरभऱ्याचे तीन हजार दोनशे हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीत बिजोत्पादन घेतले आहे. तीनही पिकांच्या विविध वाणांचा त्यात समावेश आहे. माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्यासह शेतकऱ्यांनी खारेकर्जुने (ता. नगर) येथे बिजोत्पादन पिकांची पाहणी केली.

नगर : नगर जिल्ह्यामध्ये महाबीजतर्फे गहू, ज्वारी, व हरभऱ्याचे तीन हजार दोनशे हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीत बिजोत्पादन घेतले आहे. तीनही पिकांच्या विविध वाणांचा त्यात समावेश आहे. माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्यासह शेतकऱ्यांनी खारेकर्जुने (ता. नगर) येथे बिजोत्पादन पिकांची पाहणी केली.

नगर तालुक्‍यासह कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा, श्रीगोंदा, नगर तालुक्‍यातील अनके गावे दरवर्षी बिजोत्पादन घेतात. यंदा महाबीजतर्फे फुले रेवती, फुले वसुदा, फुले अुनराधा, सुफे सुचिता आदी वाणांच्या ज्वारीचे सातशे हेक्‍टरवर, दिग्विजय, विजय, विरार, विशाल, राजविजय, जॉकी ९२१८ या वाणांचा हरभऱ्याचे एक हजार हेक्‍टर तर ६६२२ या वाणांचे दीड हजार हेक्‍टर क्षेत्रावर गव्हाचे बिजोत्पादन घेतले आहे. महाबीजतर्फे अनुदानित बियाणे दिली जातात. बिजोत्पादन झाल्यावर वीस टक्के जादा रकमेने महाबीजतर्फे खरेदी केली जाते.
 

खारेकर्जुने (ता. नगर) येथे बिजोत्पादनातून घेतलेल्या हरभरा, गव्हाच्या बहारात आलेल्या पिकांची माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोऱ्हाळे, जिल्हा व्यवस्थापक सी. के. देशमुख, मार्केटिंग अधिकारी सुनील दौंड, मंडळ कृषी अधिकारी भुसारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बहारात आलेले पीक पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...