agriculture news in Marathi, mahabeej will produce seeds in 27 districts, Maharashtra | Agrowon

‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादन
गोपाल हागे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

या रब्बी हंगामात राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान अाणि बियाणे व लागवड साहित्य उपअभियानामध्ये ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जात अाहे.

अकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानाअंतर्गत महाबीज येत्या रब्बी हंगामात गहू व हरभरा पिकांसाठी बीजोत्पादन कार्यक्रम राबविणार अाहे. राज्यातील कोकण विभाग व गोंदिया, गडचिरोली हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये दोन्ही पिके मिळून एक लाख १३ हजार ३०० क्विंटल बीजोत्पादन केले जाणार अाहे.

यात गहू ८० हजार व हरभरा ३३ हजार ३०० क्विंटल राहणार आहे. ग्राम बीजोत्पादन राबविण्यास कृषी अायुक्तांनी जिल्हानिहाय मंजुरी दिली अाहे, अशी माहिती महाबीजतर्फे देण्यात अाली. 

या रब्बी हंगामात राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान अाणि बियाणे व लागवड साहित्य उपअभियानामध्ये ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जात अाहे. राज्यातील २७ जिल्ह्यांत याची अंमलबजावणी केली जाईल. या कार्यक्रमाअंतर्गत गावाची व लाभार्थ्यांची निवड जिल्हा स्तरावर कृषी विभाग व महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक संयुक्तपणे करतील. यात प्रवर्गनिहाय लाभार्थी शेतकरी निवडून त्यांना एक एकरात हरभरा किंवा गहू पिकाचे बीजोत्पादन करता येईल. यासाठी बियाणे अनुदानावर दिले जाणार असून, हरभऱ्याला ६० टक्के, तर गव्हासाटी ५० टक्के अनुदान दिले जाईल.

निवड केलेल्या शेतकऱ्याला कृषी विभाग हा बियाण्यासाठी परमिट देणार अाहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना बियाण्याचा पुरवठा केला जाईल. यासोबतच उन्हाळी भुईमुगाचेही बीजोत्पादन केले जाणार असून, त्यालाही मंजुरी दिली जाणार अाहे.  

असे राहील नियोजन

विभाग     हरभरा     गहू
 
नाशिक     ३४५०     १७५७५
पुणे ३९७६     २४६४२
कोल्हापूर     ९८०     ३७६७
अौरंगाबाद     ३०६८     १३३८२
लातूर     ९८६५     ५५२८
अमरावती     ९३५०     ५९०२
नागपूर     २५९३     ९२०४
महाराष्ट्र     ३३३००     ८००००

 

 

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...