रब्बीसाठी महाबीजचे ४८ हजार क्विंटल बियाणे
गोपाल हागे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

अकोला : रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून, राज्यातील सर्वांत मोठे बियाणे पुरवठादार असलेल्या महाबीजने अातापर्यंत सुमारे ४८ हजार क्विंटल बियाणे बाजारपेठेत पोचविले अाहेत. यामध्ये सर्वाधिक ३० हजार क्विंटल हरभऱ्याच्या बियाण्यांचा पुरवठा झाला अाहे.

खरिपातील मूग, उडीद व सोयाबीन या पिकांची काढणी करून शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागतात. बहुतांश भागात मूग, उडदाची काढणी शेवटच्या टप्प्यात पोचली; तर सोयाबीनचा हंगाम लवकरच वेग घेणार अाहे. यानंतर साधारणतः १५ अाॅक्टोबरपासून राज्यात रब्बी पिकांची लागवड सुरू होईल.

अकोला : रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून, राज्यातील सर्वांत मोठे बियाणे पुरवठादार असलेल्या महाबीजने अातापर्यंत सुमारे ४८ हजार क्विंटल बियाणे बाजारपेठेत पोचविले अाहेत. यामध्ये सर्वाधिक ३० हजार क्विंटल हरभऱ्याच्या बियाण्यांचा पुरवठा झाला अाहे.

खरिपातील मूग, उडीद व सोयाबीन या पिकांची काढणी करून शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागतात. बहुतांश भागात मूग, उडदाची काढणी शेवटच्या टप्प्यात पोचली; तर सोयाबीनचा हंगाम लवकरच वेग घेणार अाहे. यानंतर साधारणतः १५ अाॅक्टोबरपासून राज्यात रब्बी पिकांची लागवड सुरू होईल.

या वर्षी राज्यात विविध भागांत दमदार पाऊस झालेला असल्याने त्याचा रब्बीसाठी फायदा होण्याचा अंदाज लक्षात घेता क्षेत्रवाढ अपेक्षित धरली जात अाहे. यादृष्टीने बियाण्यांचेही नियोजन केले जात अाहे.

महाबीजने हंगामासाठी अातापर्यंत ३० हजार क्विंटल हरभरा बियाणे बाजारात पोचविले अाहेत. त्यानंतर रब्बी ज्वारी १८ हजार क्विंटल अाणि करडईचे ४५० क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले अाहेत. लवकरच उर्वरित बियाणे टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अकोल्यातील पेच सुटण्याची शक्यता
गेल्या हंगामात अनुदानावर दिलेल्या हरभऱ्याची अकोला जिल्ह्यात खुल्या बाजारात विक्री तसेच लाभार्थ्यांची माहिती जुळली नसल्याचे प्रकरण गाजत अाहे. यामध्ये कृषिनिविष्ठा विक्रेत्यांची चौकशी केली जात अाहे. काहींच्या परवान्याचे निलंबनसुद्धा झाले होते. हे सर्व पाहता कृषी विभागाविरुद्ध विक्रेत्यांनी सध्या तरी एल्गार पुकारत रब्बीसाठी बियाण्याची बुकिंग केलेली नाही.

दरवर्षी जवळपास हजार क्विंटल बियाण्यांची हंगामापूर्वीच नोंदनी केली जाते. हा प्रकार लक्षात घेता या वेळी परमीटच्या साह्याने लाभार्थ्यांना अनुदानित बियाणेवाटप करण्याचा उपाय केला जात अाहे. यासाठी कृषी विभागाने संमती दर्शविली असून, वरिष्ठांकडून त्याअनुषंगाने लवकरच काम सुरू होईल. कृषी विभागाने लाभार्थ्याला परमीटर द्यायचे व परमीट अाणलेल्या शेतकऱ्याला बियाण्यांचे वाटप करायचे, असा हा प्रकार अाहे.  

अनुदान अडकलेलेच
हरभरावाटपातील घोळामुळे महाबीजसह इतर पुरवठादारांचे अनुदान काही महिन्यांपासून रखडलेले अाहे. रब्बी हंगामासाठी शासकीय योजनेनुसार शेतकऱ्यांना बियाणे अनुदानावर दिले जाते. प्रत्यक्ष दर व अनुदानित दरामधील तफावत ही शासनाकडून बियाणे उत्पादकांना दिली जाते. मागील वर्षातील रखडलेल्या अनुदानाचा मार्गसुद्धा लवकरच मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात अाहे.

 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
पीकविमा योजनेत पारदर्शकता आणा : द्राक्ष...नाशिक : सदोष पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होत...