agriculture news in Marathi, Mahabeez will provide four lakh quintal soybean seed, Maharashtra | Agrowon

महाबीज सव्वाचार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे देणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे : राज्यात यंदा सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार नाही, असे महाबीजचे म्हणणे असून यंदा सव्वाचार लाख क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीन बियाणे महाबीजकडून विक्रीसाठी आणले जाईल. 

पुणे : राज्यात यंदा सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार नाही, असे महाबीजचे म्हणणे असून यंदा सव्वाचार लाख क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीन बियाणे महाबीजकडून विक्रीसाठी आणले जाईल. 

सोयाबीन बियाण्याच्या बाजारपेठेत महाबीजची भूमिका मोलाची समजली जाते. महाबीजच्या किमती तसेच पुरवठा किती असेल याचा अंदाज घेऊन खासगी कंपन्यांकडून सोयाबीनच्या किमती ठरविल्या जातात. ‘‘राज्यात यंदा ३९ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. त्यासाठी महाबीजकडून चार लाख ३१ हजार क्विंटल बियाणे मिळणार आहे’’, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
महाबीजच्या तुलनेत खासगी कंपन्यांकडून यंदा सोयाबीन बियाण्याचा पुरवठा पाच लाख ५१ हजार क्विंटलच्या आसपास राहू शकतो. राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडूनदेखील अनुदानित किमतीत पाच हजार क्विंटलच्या आसपास बियाणे उपलब्ध होणार आहे. 

राज्याच्या खरीप हंगामात मुख्यत्वे कपाशी, सोयबीन, ज्वारी, भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग ही मुख्य पिके घेतली जातात. यंदा खरिपाचे क्षेत्र १४६ लाख हेक्टरच्या आसपास राहील. प्रमुख पिकाचा विचार करता संपूर्ण राज्यासाठी १६ लाख २६ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्या तुलनेत महाबीजकडून ५ लाख ८१ हजार क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळ ७२ हजार आणि खासगी कंपन्यांकडून १० लाख ११ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. 

बीटी कपाशीचा पेरा यंदा ४० लाख हेक्टरवर अपेक्षित धरला गेला आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, १५ मेपासून कपाशीच्या बियाण्याची विक्री राज्यभर सुरू होईल. शेतकऱ्यांकडून साधारणतः बीटी बियाण्यांच्या १६० पाकिटांची मागणी असते. त्यापैकी महाबीजकडून अवघ्या ८७ हजार पाकिटांचा पुरवठा होणार असून उर्वरित एक कोटी ६६ लाख पाकिटांची विक्री खासगी कंपन्यांकडून केली जाणार आहे. 

बियाणे बदलाकडे लक्ष ठेवून राज्याची उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न कृषी विभाग करणार आहे. केंद्र शासनाने यंदा भात, तूर, मूग, उडीद, तीळ, सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा या स्वपरागीत पिकांसाठी बियाणे बदलाचा दर ३५ टक्के निश्चित केला आहे. बाजरी, मका, सूर्यफूल, करडई या परंपरागत पिकांसाठी हेच प्रमाण ४५ टक्के ठेवण्यात आलेले आहे. 

संकरीत ज्वारी, भातासाठी मात्र बियाणे बदलाचे प्रमाण १०० टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाचे आहे. राज्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून भात अभियान यंदादेखील राबविले जाईल. मात्र, या आठ जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त इतर ९ जिल्ह्यांतील भात उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ‘भात बियाणे साखळी विकास कार्यक्रम’ राबविला जाणार आहे. 

भात उत्पादनात प्रसिद्ध असलेल्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नगर आणि नंदूरबार या ९ जिल्ह्यांची भाताची उत्पादकता राज्याच्या उत्पादकतेपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यांमधील भात उत्पादकता अजून वाढू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या भागांमध्ये भातानंतर दुसरे पीक घेतले जात नाही. भात बियाणे साखळी विकास कार्यक्रमामुळे या जिल्ह्याची उत्पादकता वाढविली जाणार असून, त्यासाठी भात प्रात्यक्षिकांसाठी अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमात दापोली कृषी विद्यापीठ, महाबीज, कृषी विभाग, शेतकरी गट आणि भातगिरणीचालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. 

खासगी कंपन्या १० लाख क्विंटल बियाणे विकणार 

पीक   अपेक्षित पेरा  महाबीजची अंदाजे बियाणे विक्री  खासगी कंपन्यांची अंदाजे विक्री 
संकरित ज्वारी   ४,५०,०००  १०,९३०   २५,१०५
सुधारित ज्वारी  ५०,०००    ०  १,३४०
संकरित बाजरी    ८,००,००० २०,०००   २३,६७५
सुधारित बाजरी ५७,००० १, ५१०  १००० 
भात  १६,००,०००   ७५,६३० १,४९,६७३
मका     ८,१६,०००  १२,०००  १,१२,०००
तूर    १६,००,०००    २,८००  ४२,०००
मूग  ५,३७,०००  २३,३९५      ४२,०००
उडीद   ४,५०,०००   १७,६२२   ४,५६८
भुईमूग    २,५० ,०००  १,५००   १,८००
सोयाबीन ३९,००,०००    ४,३१,०००     ५,५१,०००
बीटी कपाशी ४०,००,०००   ३९४    ७५,००,०००
सुधारित कपाशी     १,००,०००    ३००    ३,०५२

   
    
     
 

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...