दुधाची बिले महिलांच्या बॅंक खात्यावर जमा होणार

महादेव जानकर
महादेव जानकर

कोल्हापूर : राज्यातील सर्वांत मोठा शासकीय पशू-पक्षी खाद्यनिर्मितीचा कारखाना कोल्हापुरात सुरू केला जाणार आहे. यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. गाय व म्हैस दुधाची बिले महिलांच्या नावावर जमा झाली पाहिजेत, असा नियम लवकरच केला जाणार अाहे, अशी माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी (ता. ९) दिली.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या केदारनाथ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. श्री. जानकर म्हणाले, की राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. दुधाला प्रतिलिटर सात रुपये दरवाढ दिली आहे. दूध दरवाढीनंतर पशुखाद्याचे दरही वाढविले जात होते. मात्र, दूध दरवाढीनंतर खाद्याचे दर वाढवतील, त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा दिल्यानंतर नामांकित कंपन्यांनी आपल्याकडे येऊन पशुखाद्यदरात वाढ करणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान, राज्यातील पशू-पक्षी, कुक्कुटपालनासाठी लागणारे खाद्य कोल्हापुरातच तयार केले जाणार आहे. यामुळे येथे रोजगारनिर्मितीही होऊ शकेल. यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. तसेच, गाय-म्हशीमागे राबराब राबणारी महिला असते आणि त्यांच्या दुधाचे बिल मात्र पुरुषांकडे असते. आता येथून पुढे असे होणार नाही. दुधाचे बिलही संबंधित महिलेच्या खात्यावरच जमा करण्याची सक्ती केली जाईल. ज्याला खर्चाला पैसे हवे असतील त्यांनी त्या महिलेकडून मागून घ्यावेत. पण, त्या बिलाची मालकीणही खुद्द राबणारीच असली पाहिजे, असे ते म्हणाले.

या वेळी प्रदेश कार्यकारी सदस्य डॉ. बाळासाहेब काम्माण्णा, जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे अादी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com