‘महाएफपीसी’ करणार ५ हजार टन कांदा संकलन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः कमी झालेल्या कांदा स्थिरता आणण्यासाठी ‘महाएफपीसी’च्या (महाफार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी लिमिटेड) वतीने राज्यात पुढील २ महिन्यांत ५ हजार टन कांदा संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा कांदा पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतीमाल वाहतूक अनुदान योजनेतून विक्री केला जाईल. विक्रीतून येणारा नफा सभासद शेतकऱ्यांना वाटप केला जाईल, अशी माहिती ‘महाएफपीसी’चे कार्यकारी संचालक योगेश थोरात यांनी दिली.

सोमवारी (ता. १०) पत्रकार परिषदेमध्ये श्री. थोरात यांनी ही माहिती दिली. कांदा दराच्या स्थिरीकरणासाठी ‘महाएफपीसी’च्या २५ सदस्य शेतकरी कंपन्यांची बैठक सोमवारी (ता. ११) झाली. या बैठकीमध्ये कांदा संकलनाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये २५ कंपन्यांच्या माध्यमातून २५ केंद्रांवर कांदा संकलित करण्यात येणार आहे. कांद्याच्या दरानुसार १० रुपये प्रतिकिलोप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले जातील. तर नंतर कांदा विक्रीनंतर होणारा नफा सभासद शेतकऱ्यांना वाटप केला जाईल, असे थोरात यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत १० हजार टनांचे शीतगृह उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

गेल्या वर्षीदेखील ‘महाएफपीसी’ने ५३०० टन कांदा संकलित करून परराज्यांमध्ये विक्री केला होता. कांद्याचे दर स्थिर होण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने कांदा बाजारात न आणता साठवणूक करून ठेवावा, असे आवाहन या वेळी थोरात यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com