agriculture news in marathi, 'Mahamesh' scheme for Dhangar community | Agrowon

धनगर समाजासाठी ‘महामेष’ योजना
संतोष सिरसट
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

सोलापूर : शासनाच्या वतीने भटक्‍या जमातीच्या (भज-क) नागरिकांना राज्यभरात एक हजार मेंढ्याचे गट वाटले जाणार आहेत. ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेंतर्गत’ त्याचे वाटप होईल. या योजनेसाठी भटक्‍या जमातीच्या (भज-क, धनगर) नागरिकांनी १५ नोव्हेंबरपर्यंत www.mahamesh.in  या संकेतस्थळावर अर्ज करायचे आहेत. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना ७५ टक्‍क्‍यांचे अनुदान दिले जाणार आहे. यासाठी फक्त ऑनलाइनच अर्ज स्वीकारले जातील.

सोलापूर : शासनाच्या वतीने भटक्‍या जमातीच्या (भज-क) नागरिकांना राज्यभरात एक हजार मेंढ्याचे गट वाटले जाणार आहेत. ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेंतर्गत’ त्याचे वाटप होईल. या योजनेसाठी भटक्‍या जमातीच्या (भज-क, धनगर) नागरिकांनी १५ नोव्हेंबरपर्यंत www.mahamesh.in  या संकेतस्थळावर अर्ज करायचे आहेत. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना ७५ टक्‍क्‍यांचे अनुदान दिले जाणार आहे. यासाठी फक्त ऑनलाइनच अर्ज स्वीकारले जातील.

राज्यातील धनगर जमातीमधील सुमारे एक लाख मेंढपाळाकडून मेंढीपालनाचा व्यवसाय केला जातो. हा समाज सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळे त्यास भटक्‍या जमातीमध्ये (भज-क) समाविष्ट केले आहे. त्यानंतर त्यांना मागासवर्गीयांच्या सवलती लागू केल्या आहेत.

राज्यातील भटकंती करणारे मेंढपाळ पारंपरिक पद्धतीने करत असलेल्या मेंढीपालन या व्यवसायापासून त्यांना उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत निर्माण करून देणे, सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करणे, अर्धबंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन व्यवसायास चालना देणे, आहारामध्ये आवश्‍यक असलेल्या मांसाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करणे, सुधारित प्रजातींच्या मेंढ्यांचा प्रसार करण्यावर भर देणे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे...औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित...नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा...
राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे...खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५०००...
पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणारपुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवारनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा,...
शेतकरी आत्महत्या हे बाजारकेंद्रित...सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा, गुजरात) :...
व्यवसायाचे तंत्र शेतीच्या नियोजनात ठरले...नाशिक येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळून नरेंद्र...