दुध समस्येचा अभ्यास करून प्रश्न  सोडवा : ज्ञानेश्‍वर पवार
दुध समस्येचा अभ्यास करून प्रश्न सोडवा : ज्ञानेश्‍वर पवार

दुध समस्येचा अभ्यास करून प्रश्न सोडवा : ज्ञानेश्‍वर पवार

मुंबई :  राज्यात दुधाचा प्रश्न हा गंभीर झाला आहे. राज्यातील दूध समस्येचा अभ्यास करून हा प्रश्न सरकारने सोडवावा, अशी मागणीं महानंदचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांनी केली. ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ गायीच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर देण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. शासनाने आदेश काढल्यानंतर दोन महिने २७ रुपये प्रतिलिटर दराने महानंदने दुधाची खरेदी केली. मात्र, दुधाची परिस्थिती लक्षात घेता २७ रुपये प्रतिलिटर दर देणे परवडत नसल्यामुळे महानंदनेदेखील सुरुवातीला २१ रुपये दर देणे सुरू केले. त्यानंतर सध्या तर महानंद प्रतिलिटर २० रुपये एवढाच दर दुधाला देत आहे. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे दूध दर देणे दूध संघाला परवडत नसल्यामुळे हा दूध दर दिला जात नाही. कर्नाटकात शेतकऱ्यांना दूध दर देता यावा, यासाठी राज्य सरकारकडून प्रतिलिटर ७ रुपये मदत शेतकऱ्यांना केली जाते. कर्नाटक सरकारकडून मदत केली जाते. मात्र, महाराष्ट्रात फक्त जीआर काढला जातो. या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अभ्यास करूनच या सर्व विषयावर निर्णय घ्यावेत, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com