राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय ६७) यांचे आज (गुरुवारी) पहाटे हृदयविकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. फुंडकर यांच्या निधनाने राजकीय, कृषी आणि ग्रामिण विभागातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन तपासणी केली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात नेण्यास सांगितले. पण, सोमय्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालविली.

बुलडाणा, खामगाव परिसरात भाजपला वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. शेतकऱ्यांशी भाजपला जोडण्याचे काम फुंडकर करत होते. राज्यात शेतकऱ्यांची आंदोलने होत असताना फुंडकर यांनी योग्य पद्धतीने ती हाताळली. सामान्या नागरिकांशी नाळ जोडलेला नेता अशी त्यांची ओळख होती. पांडुरंग फुंडकर हे तीन वेळा अकोला मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. फुंडकर यांचे प्रार्थिव आज (ता.३१) दुपारी ३.४५  अकोला विमानतळ येथे आणण्यात येणार आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता खामगाव येथे सिद्धिविनायक टेक्निकल विद्यालय येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • खामगांव ते आमगांव ही यात्रा काढून शेतकरी प्रश्नाना फोड़ली होती वाचा
  • बुलडाणा जिल्ह्यात नांदूरा तालुक्यातील एका खेडयात झाला होता जन्म
  • तिन वेळा अकोल्याचे खासदार
  • सातत्याने विधान परिषदेत प्रतिनिधित्व, विरोधी पक्षनेते
  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष पदही सांभाळले
  • खडसे यांच्या राजीनाम्या नंतर मिळाले होते कृषिमंत्रीपद
  • अतिशय वाईट आणि धक्कादायक बातमी!‬ ‪आमचे ज्येष्ठ नेते, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे आज निधन झाले. ‪त्यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकाऱ्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे.* शेती आणि सहकारातील प्रश्नांची जाण असलेला नेता आपण गमावला आहे.‬ ‪विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भाऊसाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली ! - मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस

    भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नेते म्हणून फुंडकर यांची ओळख होती. भाजपच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होती. - रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष 

    माझा त्यांच्या निधनाच्या बातमीवर विश्वासच बसला नाही. भाजपला महाराष्ट्रात उभारी देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची नीट जाण त्यांना होती.  - चंद्रकांत पाटील, भाजप नेते

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com