agriculture news in marathi, Maharashtra Best of all in National Gokul Mission's West division | Agrowon

‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम विभागात महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’अंतर्गत पशुसंवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराचा बहुमान पश्चिम विभागातील महाराष्ट्र राज्याने पटकावला असून, या पुरस्कारासह एकूण सात पुरस्कारांवर राज्याने मोहोर उमटवली आहे.

मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’अंतर्गत पशुसंवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराचा बहुमान पश्चिम विभागातील महाराष्ट्र राज्याने पटकावला असून, या पुरस्कारासह एकूण सात पुरस्कारांवर राज्याने मोहोर उमटवली आहे.

केंद्र शासनाकडून देशातील चार विभागांतर्गत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्रासह, गुजरात,  मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड या राज्यांचा; तसेच दादरा व नगर हवेली आणि दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. यात राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार, राष्ट्रीय गोकूळ मिशनची उत्कृष्ट अंमलबजावणी, उत्कृष्ट पशुवैद्यक, उत्कृष्ट कृत्रिम रेतन सेवा पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार राज्याला प्राप्त झाले आहेत.

पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट राज्याच्या पुरस्कारासाठी पशुधनाची उत्पादकता, पशुवैद्यकीय सेवेचा दर्जा, रोग नियंत्रण, पशुप्रजनन कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी, कृत्रिम रेतनाचे काम, रोग प्रादुर्भावासंदर्भातील माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरण्यास प्रतिसाद, केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, पशुसंवर्धन योजनांची माहिती पशुपालकांपर्यंत पोचविण्याचा विस्तार कार्यक्रमाची उत्कृष्ट अंमलबजावणी आदी बाबींचा विचार करण्यात आला. देशी गोवंश तसेच म्हशींच्या जातींचे जतन व संवर्धन यावर ‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये विशेष भर देण्यात आला आहे.

राज्याला प्राप्त झालेले पुरस्कार - 

  • राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार : प्रथम पुरस्कार :अनिरुद्ध भगीरथ पाटील, तरसाली, ता. बागलाण, जि. नाशिक

     उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार  - 

  • प्रथम पुरस्कार - डॉ. अनिल तुळशीराम परिहार, सहायक पशुसंवर्धन आयुक्त, तालुका लघूू पशुवैद्यकीय रुग्णालय, कराड  (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार - डॉ. दिनकर भाऊराव बोर्डे, सहायक पशुसंवर्धन आयुक्त, तालुका लघू पशुवैद्यकीय रुग्णालय, पंढरपूर (जि. सोलापूर), उत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ पुरस्कार - द्वितीय पुरस्कार - बाळासाहेब तुकाराम कोल्हे, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, बायफ, सोनेवाडी, ता. कोपरगाव  (जि. नगर)
  • द्वितीय पुरस्कार - डॉ. अनिल विठ्ठलराव इंगोले, पशुधन विकास अधिकारी, सासवड (जि. पुणे) 
  • राष्ट्रीय गोकूळ मिशनची उत्कृष्ट अंमलबजावणी : प्रथम पुरस्कार : महाराष्ट्र

इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...
सोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...
तेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...
‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...
अभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...
समविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...
स्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...
भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...
ग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...
शेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...