खासदार नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा

खासदार नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा
खासदार नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी  शुक्रवारी (ता. ८) खासदारकीचा राजीनामा लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी भाजपच्या धोरणांवर नाराजी दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करत होते. शिवाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करत आहेत.

भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर जाहीर टीका केली होती. शिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनाही लक्ष्य केले होते. शिवाय, राज्य सरकारने सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावले उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असे म्हणत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले होते.

नाना पटोले यांनी 2008 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सन 2014 मध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा मतदारसंघात पराभव केला होता. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असूनही नाना पटोले यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या पुढच्या प्रवासाबाबत माहिती देणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com