Agriculture news in marathi, Maharashtra, chief Minister Devendra Fadnvis | Agrowon

प्रक्रिया उद्योग धोरण तातडीने सादर करा : मुख्यमंत्री
विजय गायकवाड
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

अन्न व कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. या उद्योगामुळे कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. त्यासाठी नाबार्डअंतर्गत २००० कोटींचा विशेष निधी उभारला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील अन्न व कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेले धोरण मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी अन्न व कृषी प्रक्रिया उद्योगासंदर्भात करण्यात आलेल्या धोरणाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले, की अन्न व कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. या उद्योगामुळे कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या प्रचलित योजना आहेत. नाबार्डअंतर्गत २००० कोटींचा विशेष निधी उभारला आहे. त्याद्वारे वैयक्तिक युनीट उभारण्यासाठी अनुदान देण्यात येते. केंद्र शासनानेदेखील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी कर सवलती दिल्या आहेत.
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी फळ-भाजीपाला धुण्यासाठी पाणी लागते, त्यांना सुटसुटीतपणे पाणी परवाना देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर शीतगृहासाठी वीज जास्त प्रमाणात लागते त्याचा विचार करता सवलतीच्या दराने वीजपुरवठा करण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. प्रदूषण न होणाऱ्या प्रक्रिया उद्योगांची यादी करून अशा उद्योगांना ना हरकत परवाना देण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. या सर्व बाबी धोरणात समाविष्ट करून तातडीने ते मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता आदी उपस्थित होते. कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी सादरीकरण  केले.
 

 

इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...
पुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...
सीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...
‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...
वनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती  ः पानपिंपरी तसेच वनौषधी...
मराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...
नगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...
पानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...
डॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....
दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...
उपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...
आंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...
औरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...