agriculture news in marathi, Maharashtra CM doesn't last long says Devendra Fadanvis | Agrowon

महाराष्ट्रात मुख्यमंत्री दीर्घकाळ राहत नाही : देवेंद्र फडणवीस
सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई ः भूमिपूजन केल्यानंतर तो प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचे उद्‌घाटन करण्याची संधी मला तीन वर्षांत मिळाली आहे. हे माझे भाग्य समजतो. कारण महाराष्ट्रात मुख्यमंत्री दीर्घकाळ राहत नाही, असे धक्‍कादायक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विक्रोळी येथे एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. फडणवीस यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई ः भूमिपूजन केल्यानंतर तो प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचे उद्‌घाटन करण्याची संधी मला तीन वर्षांत मिळाली आहे. हे माझे भाग्य समजतो. कारण महाराष्ट्रात मुख्यमंत्री दीर्घकाळ राहत नाही, असे धक्‍कादायक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विक्रोळी येथे एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. फडणवीस यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

तीन वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा, महापालिका, ग्रामपंचायती यामध्ये भाजपला राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवून दिले. तसेच पक्षाअंतर्गत, मंत्रिमंडळातील मातब्बर सहकाऱ्यांशी समर्थपणे सामना केल्यानंतर फडणवीस यांच्या खुर्चीस कोणताही धोका नव्हता. त्यांचे स्थान अबाधित असताना फडणवीस यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय जाणकार तर्क लावत आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने खेळलेली चाल, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून दिले जाणारे प्रतिनिधी आदी निवडणुकीचे आव्हान पाहता मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्‍तव्य नक्‍कीच धक्‍कादायक मानले जाते. 

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...