राज्यातील धरणसाठा ६३ टक्क्यांपर्यंत

राज्यातील धरणसाठा ६३ टक्क्यांपर्यंत
राज्यातील धरणसाठा ६३ टक्क्यांपर्यंत

पुणे : गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. परिणामी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, ४१ धरणांमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. आतापर्यंत (ता. ३०) राज्यातील तीन हजार २४७ धरणांमध्ये ११७८ म्हणजेच ६३.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा ३.५३ टक्केनी कमी आहे. यंदा राज्यातील धरणे भरतील की नाही याची अजूनही चिंता आहे. परंतु येत्या उन्हाळ्यात भासणारी पाण्याची टंचाई कमी होण्यास नुकताच झालेला पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.   तीन महिन्यांत ८० टक्के पाऊस ः   एक जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत सरासरी ९२९.२ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. मात्र, चालू वर्षी अवघा ७४३.२ मिलिमीटर म्हणजेच अवघे ८०.० टक्के पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत विचार केल्यास आत्तापर्यंत वीस टक्के कमी पाऊस पडला आहे. एकंदरीत जून महिन्यात पडलेला पाऊस आणि जुलै, ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाचा विचार केल्यास जूनमध्ये अधिक पाऊस पडल्याचे दिसून येते. त्यामुळे तूर, बाजरी, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, भात पिकांना चांगला दिलासा मिळाला असून पिकेही वाढीच्या अवस्थेत आहेत. 

यंदा पावसाळ्यात जून महिन्यात आणि जुलैत १३ तारखेच्या दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. कोकणातील घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस पडला. विदर्भातील काही भागातही मध्यम ते जोरदार पाऊस झाला होता. वीस ते ३० ऑगस्टच्या दरम्यान राज्यातील बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले भरून वाहत होते. अनेक ठिकाणी बंधारे भरून वाहू लागल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 

गेल्यावर्षी होता ६७ टक्के पाणीसाठा ः   गेल्या वर्षी ऑगस्ट, सप्टेबर महिन्यात चांगला झाल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात भासणारी पाणीटंचाई यंदा काही प्रमाणात कमी झाली होती. मे महिन्यात राज्यात टॅंकरची संख्या अवघी दोन हजारांपर्यंत होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दीड ते दोन हजार टॅंकरची संख्या कमी झाली होती. याच कालावधीत गेल्या वर्षी ६७.०२ टक्के एवढा पाणीसाठा होता. चालू वर्षी ३० ऑगस्टपर्यंत राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण धरणांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला असल्याचे स्पष्ट आले आहे. 

मराठवाड्यात ४१ टक्के पाणीसाठा ः  पावसाचे अडीच उलटले तरी, मराठवाड्यात पुरेसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे मराठवाडा धरणांनी अक्षरश तळ गाठला होता. परंतु, गेल्या आठवड्यापासून कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा अनेक भागात जोरदार ते मुसळधार पाऊस झाला. परिणामी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून मराठवाड्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा झाला आहे. परंतु, हा पाणीसाठा वर्षभर पुरेल एवढा असला तरी पिण्याच्या पाण्याची चिंता करावी लागणार नसल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत मराठवाड्यातील धरणांमध्ये १७०.१६ टीएमसी म्हणजेच ४१.९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. यात पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणातून सोडलेल्या पाण्याचाही समावेश आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा आठ टक्‍क्‍याने अधिक आहे. 

मध्यम, लहान धरणे भरण्याच्या मार्गावर ः  मध्यम, लहान धरणे भरण्याच्या मार्गावर राज्यातील बहुतांशी भागात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या धरणांत पाणीसाठा येत असला तरी मध्यम व लहान धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणे भरली असून पाण्याचा विसर्गही सोडण्यात आला आहे. राज्यात मध्यम धरणाची संख्या २५५ एवढी आहे. या धरणामध्ये गेल्या वर्षी ५७.१३ टक्के पाणीसाठा होता. यंदा या धरणांमध्ये ११९.३२ टीएमसी म्हणजेच ५१.५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. लहान धरणाची संख्या दोन हजार ८५५ एवढी आहे. गेल्या वर्षी या धरणामध्ये ३९.९९ टक्के पाणीसाठा होता. यंदा या धरणांमध्ये ८९.५६ टीएमसी म्हणजेच ४१.९७ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.      राज्यात ९५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भरलेली धरणे  निम्र चोंडे, भातसा, कवडास उ. बंधारा, धामणी, तिल्लारी, भंडारदरा, निळवंडे, ओझरखेड, कडवा, करंजवण, तिसगाव, भावली, दारणा, पुणेगाव, वैतरणा, ज. वि. प्रकल्प,  वाघाड, तुळशी, दूधगंगा, राधानगरी, खडकवासला, चासकमान, डिंभे, निरादेवधर, पवना, पानशेत, भाटघर, भामा आसखेड, वडज, वरसगाव, वारणा, कन्हेर, कोयना, तारळी, धोमबलकवडी, भीमा (उजनी), तानसा, बारवी, मोडकसागर, मध्य वैतरणा, ठोकरवाडी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com