agriculture news in marathi, maharashtra farmer loan waiver scheme | Agrowon

आठवड्यात ५० लाख अर्ज भरण्याचे आव्हान
मारुती कंदले
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मुंबई  राज्य सरकारने कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी (ता.१५) दुपारी बारापर्यंत ९९ लाख १ हजार ९६६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन नोंदणी केली असून, सुमारे ५१ लाख ५१ हजार ६८४ शेतकरी कुटुंबीयांचे अर्ज भरून पूर्ण झाले आहेत. आता एका आठवड्यात राहिलेल्या सुमारे ५० लाख शेतकरी कुटुंबांचे अर्ज भरण्याचे आव्हान आहे.

मुंबई  राज्य सरकारने कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शुक्रवारी (ता.१५) दुपारी बारापर्यंत ९९ लाख १ हजार ९६६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन नोंदणी केली असून, सुमारे ५१ लाख ५१ हजार ६८४ शेतकरी कुटुंबीयांचे अर्ज भरून पूर्ण झाले आहेत. आता एका आठवड्यात राहिलेल्या सुमारे ५० लाख शेतकरी कुटुंबांचे अर्ज भरण्याचे आव्हान आहे.

सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजेचे भारनियमन वाढले आहे. कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मिती थंडावली आहे. त्याचा मोठा परिणाम ग्रामीण महाराष्ट्रातील वीजपुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे इंटरनेट सुविधाही खंडित होण्याची शक्यता असून, येत्या आठवडाभरात अजूनही अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना मुदतीत कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून मुदतवाढीची शक्यता नसल्याने या कालावधीत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. 

दरम्यान, शिवसेनेने दसऱ्यापूर्वी कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे; तर राज्य सरकार दिवाळीआधी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देण्याच्या प्रयत्नात आहे. पुढील महिन्यात राज्यात सुमारे सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांचा मुहूर्त साधण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शुक्रवारी (ता.१५) दुपारी बारापर्यंत ९९ लाख १ हजार ९६६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन नोंदणी केली असून सुमारे ५१ लाख ५१ हजार ६८४ शेतकरी कुटुंबीयांचे अर्ज भरून पूर्ण झाले आहेत. येत्या आठवडाभरात या संख्येत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा करण्यासाठी एक महिन्याहून कमी दिवस उरतात. पुढील महिन्यात १८ तारखेपासून दिवाळी सुरू होते. त्याआधी कर्जमाफीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे असणार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...
भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...
ग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...
शेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...
‘एमएसीपी’चे फलित काय ?पुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...
एकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...
स्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...
केरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...
वानरांचा बंदोबस्त करणार कसा? माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...
योजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...
क्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...
‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...
मॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...
मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...
वर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...