agriculture news in marathi, Maharashtra get four National aWards in National Gokul Mission | Agrowon

‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’अंतर्गत महाराष्ट्राला चार राष्ट्रीय पुरस्कार
वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’च्या वतीने आज महाराष्ट्राला चार पुरस्कार प्राप्त झाले. पुरस्कारांचे वितरण केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि  केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांच्या हस्ते करण्यात आले. 

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’च्या वतीने आज महाराष्ट्राला चार पुरस्कार प्राप्त झाले. पुरस्कारांचे वितरण केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि  केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांच्या हस्ते करण्यात आले. 

येथील पुसा राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रातील ए. पी. शिंदे सभागृहात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘जागतिक दुग्ध दिना’चे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण मंत्री राधामोहनसिंह, राज्यमंत्री कृष्णा राज आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’अंतर्गत राष्ट्रीय गोपालरत्न आणि अन्य पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. 

यावर्षी नाशिक जिल्ह्यातील तरसाळी (ता. बागलान) येथील अनिरुद्ध पाटील यांना राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. पाटील हे अभियंता असून काही काळ त्यांनी नोकरी केली. नंतर गावी येऊन त्यांनी ‘सारजा डेरी फर्म’ सुरू केले. सध्या त्यांच्याकडे १३० गीर गायी आहेत. या गायींपासून दरराेज २०० लिटर दूध मिळते. गायींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय, देशी गोवंशाची वाढ व्हावी यासाठी प्रचार-प्रसार करणे, स्थानिक शेतकऱ्यांना पशुधनाचे महत्त्व पटवून देण्याचे काम ते करतात. याशिवाय गायीपासून दुग्ध, गोमूत्र, गवरी, तूप, सेंद्रिय खत आदीचे उत्पादनही करतात. त्यांच्या या विशेष कार्याची दखल म्हणून त्यांना राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह असे आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन मंत्रालयाच्या वतीने ‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’ उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल महाराष्ट्राला आज पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह असे आहे. 

उत्कृष्ट पशुचिकित्सकाचा पश्चिम विभागाचा प्रथम पुरस्कार कराड (जि.सातारा) शासकीय पशुचिकित्सक पॉलीक्लिनिकचे सहायक आयुक्त डॉ. अंकुश परिहार यांना तर द्वितीय पुरस्कार पश्चिम विभागाचा द्वितीय पुरस्कार पंढरपूर (जि. साेलापूर) येथील पशुचिकित्सालयातील सहायक आयुक्त डॉ. दिनकर र्बोडे यांना केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ३० हजार रुपये आणि सन्मान चिन्ह असे आहे.
 

इतर बातम्या
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...