केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी कर्मण पुरस्कार' महाराष्ट्राला

राज्याच्या कृषी विभागात सर्वच कर्मचाऱ्यांनी २०१६-१७ मध्ये अन्नधान्य उत्पादनात एकदिलाने आणि कष्टपूर्वक काम केले. त्याचीच ही पावती आहे. या पुरस्कारामुळे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना अजून प्रोत्साहन मिळणार आहे. - विकास देशमुख, माजी कृषी आयुक्त
केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी कर्मण पुरस्कार' महाराष्ट्राला
केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी कर्मण पुरस्कार' महाराष्ट्राला

पुणे: अन्नधान्य उत्पादनात देशात सर्वांत चांगली कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्राच्या कृषी विभागाला पाच कोटी रुपयांचा ''कृषी कर्मण पुरस्कार'' केंद्र सरकारने जाहीर केला आहे.  केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे. २०१६-१७ मध्ये महाराष्ट्राने अन्नधान्य उत्पादनवाढीसाठी केलेल्या विविध कामांचा केंद्र शासनाने आढावा घेतला. या कालावधीत कृषी आयुक्त म्हणून विकास देशमुख यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा चांगला मेळ घातला. त्यामुळे राज्याच्या वाट्याला पुरस्कार आल्याची माहिती विस्तार विभागाच्या सूत्रांनी दिली. विद्यमान आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनीदेखील अन्नधान्य व फलोत्पादन योजनांचा सातत्याने आढावा घेत उत्पादनाला चालना दिली आहे.  ‘महाराष्ट्राने शेतकऱ्यांना सोबत घेत नवे तंत्रज्ञान आणि चांगल्या विस्तार सेवेची सांगड घातल्यामुळे अन्नधान्य उत्पादनात २०१६-१७ मध्ये आघाडी घेतली. त्यामुळे कृषी विभाग अभिनंदनाला पात्र आहे. पाच कोटी रुपयांचा पुरस्कार मार्च महिन्यात दिल्लीत प्रदान केला जाईल,’ असे केंद्रीय कृषी मंत्रालनाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.  श्री. देशमुख यांच्या कालावधीत राज्याला २०१४ मधील कडधान्य उत्पादनाचा एक कोटीचा पुरस्कार यापूर्वीही केंद्र शासनाने दिला होता. त्याआधी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, उमाकांत दांगट आणि विकास देशमुख यांच्या नियोजनातून राबविलेल्या ‘क्रॉपसॅप’ प्रकल्पाला देश पातळीवरचा पुरस्कार पंतप्रधांनांनी बहाल केला होता.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com