agriculture news in marathi, Maharashtra Hottest state in the country | Agrowon

महाराष्ट्र सर्वाधिक उष्ण राज्य
अमोल कुटे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने देशात महाराष्ट्र राज्य आणि पूर्व विदर्भाचा भाग सर्वांत उष्ण ठरत आहे. महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, राजस्थान राज्यांत अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भासह सर्वंच ठिकाणी तापमान सरासरीच्या वर गेले होते; तर २१ एप्रिल रोजी चंद्रपूर येथे हंगामातील उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

पुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने देशात महाराष्ट्र राज्य आणि पूर्व विदर्भाचा भाग सर्वांत उष्ण ठरत आहे. महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, राजस्थान राज्यांत अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भासह सर्वंच ठिकाणी तापमान सरासरीच्या वर गेले होते; तर २१ एप्रिल रोजी चंद्रपूर येथे हंगामातील उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ, तेलंगणामध्ये बहुतांशी ठिकाणी, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी; तर बिहार, ओरिसा राज्यात काही ठिकाणी तापमान चाळिशीपार गेले आहे. उर्वरित भारतात बहुतांशी ठिकाणी तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, तेलंगणाचा उत्तर भाग देशात सर्वाधिक तापला आहे. 

राज्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान
राज्यातील तापमानाचा विचार करता, एप्रिल महिन्यात विदर्भात सरासरी ४०.९ ते ४२.२ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ३९.१ ते ४१.३ अंश, मध्य महाराष्ट्रात ३७.२ ते ४१.९ अंश आणि कोकणात ३१.९ ते ३३.० अंश सेल्सिअस तापमान असते. या महिन्यात विदर्भातील चंद्रपूर, मराठवाड्यातील नांदेड, मध्य महाराष्ट्रातील जळगाव आणि कोकणातील डहाणू, सांताक्रुझ येथील एप्रिलचे सरासरी तापमान सर्वाधिक आहे. यंदा राज्यात बहुतांशी ठिकाणी सरासरीपेक्षा १ ते ३.७ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली आहे. 

तापमान अधिक राहण्याचे पूर्वानुमान हवामान विभागाने ३ मार्च २०१८ रोजी मार्च ते मे या कालावधीतील उष्णतेचे पूर्वानुमान देताना या तीन महिन्यात कमाल तापमानात एक अशांपेक्षा अधिक वाढ हाेण्याची शक्यता वर्तविली होती. उन्हाचा चटका वाढून उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाजही वर्तविला होता. त्यानंतर १ एप्रिल रोजी उन्हाळ्याचा (एप्रिल ते जून) दिर्घकालीन अंदाजातही तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचे पुर्वानुमान दिले होते.  महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे मे आणि जून महिन्यातही उन्हाचा चटका अधिक राहणार आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
तहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...
साखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...
पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
कृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...
'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...