agriculture news in marathi, Maharashtra irrigation council in Parbhani Saturday From sunday | Agrowon

परभणीत शनिवारपासून महाराष्ट्र सिंचन परिषद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 डिसेंबर 2017

परभणी : दुर्मिळ पाण्याचे आदर्श व्यवस्थापन या विषयावर परभणी येथे शनिवारी (ता.३०) आणि रविवारी (ता.३१) १८व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त उत्कृष्ट पाणी व्यवस्थापनाबद्दल परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

परभणी : दुर्मिळ पाण्याचे आदर्श व्यवस्थापन या विषयावर परभणी येथे शनिवारी (ता.३०) आणि रविवारी (ता.३१) १८व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त उत्कृष्ट पाणी व्यवस्थापनाबद्दल परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

शनिवारी (ता.३०) सकाळी दहा वाजता ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये या परिषदेचे उद्‌घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते होणार आहे. अकोला येथील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. व्ही. एम. भाले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या वेळी स्वागताध्यक्ष गणेशराव दुधगांवकर, महाराष्ट्र सिंचन सहयोगचे संस्थापक डाॅ. माधवराव चितळे, अध्यक्ष डाॅ. दि. मा. मोरे, सिंचन सहयोग परभणीच्या अध्यक्षा डाॅ. संध्याताई दूधगांवकर आदी उपस्थित राहणार आहेत.

सिंचन परिषदेतर्फे उत्कृष्ट पाणी व्यवस्थापनाबद्दल शेतकऱ्यांना देण्यात येणारे पुरस्कार आर. टी. देशमुख (रा. इरळद, जि. परभणी), प्रताप काळे (रा. धानोरा काळे, जि. परभणी), चंद्रकांत कुलकर्णी (रा. डोंगरकडा, जि. हिंगोली), रामेश्वर मांडगे (रा. बेलवाडी, जि. हिंगोली) यांना देण्यात येणार आहेत. या वेळी डाॅ. एस. बी. वराडे, माधवराव पाटील शेळगांवकर, उत्तम दगडू, वसंतराव अंबुरे, यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातून येऊन यशस्वी उद्योग उभारणी केल्याबद्दल भालचंद्र पेडगांवकर, पुरुषोत्तमलाल खुराणा, युसूफ इनामदार, मुरलीधर डाके यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये पाणी व्यवस्थापन या विषयावरील परिसंवादमध्ये डाॅ. माधवराव चितळे, डाॅ. दि. मा. मोरे, विजयअण्णा बोराडे, डाॅ. सुभाष टाले, या. रा. जाधव, डाॅ. भगवान कापसे, डाॅ. एस. बी. वराडे, डाॅ. सुनील गोरंटीवार, रा. ब. घोटे, डाॅ. सुरेश कुलकर्णी सहभागी होणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...