महाराष्ट्रात सर्वाधिक पीक विम्याची नोंद

महाराष्ट्रात सर्वाधिक पीक विम्याची नोंद
महाराष्ट्रात सर्वाधिक पीक विम्याची नोंद

नवी दिल्ली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत दोन वर्षांत देशभरातील १० कोटी ९१ लाख ४४ हजार ९८२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २ कोटी २१ लाख ३८ हजार ६०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान पीकविमा योजनेसंदर्भात बुधवार (ता.१२) संसदेत माहिती दिली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशभर २०१६ च्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केल्याची माहिती कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या माहितीत पुढे आली आहे.

२०१६-१७ मध्ये १ कोटी २० लाख नोंदणी पंतप्रधान पीकविमा योजनेची खरीप हंगाम २०१६ मध्ये सुरवात झाली. या वेळी राज्यातील १ कोटी ९ लाख ९७ हजार ३९८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. याच हंगामात देशभरातील २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४ कोटी २ लाख ५८ हजार ७३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. २०१६-१७ च्या खरीप हंगामात राज्यातील १० लाख ८ हजार ५३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर याच हंगामात देशातील एकूण १ कोटी ७०  लाख ५६ हजार ९१६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. महाराष्ट्रात २०१६ खरीप आणि २०१६-१७ च्या रबी हंगामात एकूण १ कोटी २० लाख ५ हजार ९३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. २०१७-१८ मध्ये १ कोटी १ लाख नोंदणी राज्यात २०१७ खरीप आणि २०१७-१८ च्या रबी हंगामात एकूण १ कोटी १ लाख ३२ हजार ६७७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी नोंदणी केली होती. २०१७ च्या खरीप हंगामात राज्यातील ८७ लाख ६८ हजार २११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली तर देशभरातील २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील एकूण ३ कोटी ४७ लाख ७६ हजार ५५ शेतकऱ्यांनी या हंगामात नोंदणी केली. २०१७-१८ च्या रबी हंगामात राज्यातील १३ लाख ६४ हजार ४६६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर याच हंगामात देशातील एकूण १ कोटी ७० लाख ५३ हजार २७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com