दक्षिण कोरियासोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार
विजय गायकवाड
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई : महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी दक्षिण कोरियासोबत नुकताच सेऊल येथे सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण कोरियाच्या भूमी, पायाभूत सुविधा आणि परिवहनमंत्री किम ह्यू मी यांच्याशी विविध प्रकल्पांच्या उभारणीबाबत विस्ताराने चर्चा केली. यासोबतच नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉरच्या उभारणीसाठी दक्षिण कोरियाने सहकार्य करण्यास उत्सुकता दर्शविली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी दक्षिण कोरियासोबत नुकताच सेऊल येथे सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण कोरियाच्या भूमी, पायाभूत सुविधा आणि परिवहनमंत्री किम ह्यू मी यांच्याशी विविध प्रकल्पांच्या उभारणीबाबत विस्ताराने चर्चा केली. यासोबतच नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉरच्या उभारणीसाठी दक्षिण कोरियाने सहकार्य करण्यास उत्सुकता दर्शविली आहे.

दक्षिण कोरियाच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचे मंगळवारी (ता. २७) सेऊल येथे आगमन झाले. त्यानंतर श्रीमती किम ह्यू मी यांच्याशी या शिष्टमंडळाने संवाद साधला. महाराष्ट्रात उभारण्यात येत असलेल्या विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांनी या वेळी श्रीमती किम यांना माहिती दिली.

औद्योगिक विकासातही महाराष्ट्र अग्रेसर असून, भारतात झालेल्या परकी गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक राज्यात झाली असल्याचे सांगून दक्षिण कोरियातील उद्योगसमूहांनी राज्यातील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. दक्षिण कोरियन नेत्यांनी राज्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांत विशेष रुची दर्शविली.

त्यानंतर राज्यातील विविध पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी या वेळी उभयपक्षांत सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार स्मार्ट सिटी, महामार्ग, विमानतळ, मेट्रो आदी महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उभारणीत राज्याला दक्षिण कोरियाचे वाढीव सहकार्य लाभणार आहे. त्यात प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे नियोजन, धोरणात्मक बाबी, तंत्रज्ञान, विधिविषयक यंत्रणा आदींचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या वेळी कोरियन नेत्यांचे आभार मानले.

या चर्चेदरम्यान महाराष्ट्राच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...