agriculture news in marathi, 'Maharashtra pattern of management of bond ali will be created' | Agrowon

‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र पॅटर्न निर्माण व्हावा’
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी या किडींच्या अचूक सर्वेक्षणास विशेष महत्त्व आहे. कीड-रोग सर्वेक्षण प्रकल्पाच्या (क्रॉपसॅप) माध्यमातून गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र पॅटर्न निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले.

परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी या किडींच्या अचूक सर्वेक्षणास विशेष महत्त्व आहे. कीड-रोग सर्वेक्षण प्रकल्पाच्या (क्रॉपसॅप) माध्यमातून गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र पॅटर्न निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभाग आणि राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा पिकांवरील कीड-रोग व्यवस्थापन, सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत मराठवाडा विभागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विद्यापीठांतील जिल्हा समन्वयक, मास्टर ट्रेनर्स यांच्यासाठी सोमवारी (ता. १८) आणि मंगळवारी (ता.१९) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्षस्थानी डॉ. प्रदीप इंगोले होते. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, लातूर विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. इंगोले म्हणाले, की कीड व रोगाचा प्रादुर्भाव अचूक सर्वेक्षणाने ओळखून वेळीच उपाय योजनेबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. बोंड अळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्यांचा प्रभावी वापर करावा.

श्री. भताने म्हणाले, की क्रॉपसॅप प्रकल्पाचे स्वरूप बदलेले आहे. कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांनी कीड- रोग सर्वेक्षणाचे काम जबाबदारीने करावे.
या वेळी प्रास्ताविक करून डॉ. झंवर यांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. डॉ. बस्वराज भेदे यांनी सोयाबीन वरील कीड व्यवस्थापन, डॉ. अनंत बडगुजर यांनी किडींच्या सर्वेक्षण पद्धती, डॉ. एस. डी. बंटेवाड यांनी तुरीवरील कीड तर डॉ. घंटे यांनी रोग व्यवस्थापनावर माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले. या प्रशिक्षणात मराठवाड्यातील २०० कृषी अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...