agriculture news in marathi, Maharashtra state in grean chilli per quintal 500 to 3000 rupes | Agrowon

राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते ३००० रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

पुण्यात प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये
पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ११) हिरवी मिरचीची सुमारे २० टेम्पाे आवक झाली हाेती. यावेळी दहा किलाेला १०० ते २५० रुपये दर हाेता. हा दर सरासरी पेक्षा चांगला असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले.  बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची प्रामुख्याने आवक ही आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात येथून हाेत असते. तर स्थानिक आवक ही अत्यल्प असते. गुरुवारी (ता. ११) झालेल्या आवकेत परराज्यातून सुमारे १५ तर स्थानिक सुमारे ५ टेम्पाे आवक झाली हाेती, असे भुजबळ यांनी सांगितले.

पुण्यात प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये
पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ११) हिरवी मिरचीची सुमारे २० टेम्पाे आवक झाली हाेती. यावेळी दहा किलाेला १०० ते २५० रुपये दर हाेता. हा दर सरासरी पेक्षा चांगला असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले.  बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची प्रामुख्याने आवक ही आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात येथून हाेत असते. तर स्थानिक आवक ही अत्यल्प असते. गुरुवारी (ता. ११) झालेल्या आवकेत परराज्यातून सुमारे १५ तर स्थानिक सुमारे ५ टेम्पाे आवक झाली हाेती, असे भुजबळ यांनी सांगितले.

सोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल २५०० रुपये
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरचीची आवक कमी राहिली. पण मागणी असल्याने हिरवी मिरचीला उठाव चांगला मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात  आले. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी २५० रुपये दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची रोज ४० ते ५० क्विंटलपर्यंत आवक झाली. हिरव्या मिरचीची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने खूपच कमी होती. पण मागणी चांगली होती. गेल्या महिनाभरापासून सातत्याने मिरचीला उठाव मिळतो आहे. या सप्ताहात मिरचीला प्रतिदहा किलोसाठी किमान ७० रुपये, सरासरी १०० रुपये आणि सर्वाधिक २०० रुपये असा दर मिळाला. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिरचीची आवक रोज ७० क्विंटलपर्यंत राहिली. तर प्रतिदहा किलोसाठी किमान १०० रुपये, सरासरी १५० रुपये आणि सर्वाधिक २२५ रुपये मिळाला. त्या आधीच्या सप्ताहात हाच दर किमान ९० रुपये, सरासरी १७० रुपये आणि सर्वाधिक २५० रुपये मिळाला. तर आवक प्रतिदिन ३० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे या सप्ताहातही पुन्हा मिरचीला उठाव मिळण्याची चिन्हे आहेत.

नगरला प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये
नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरव्या मिरचीची १०२ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १२०० ते २२०० रुपये व सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. नगर बाजार समितीत दर दिवसाला दीडशे क्विंटलपर्यंत हिरव्या मिरचीची आवक होत असते. ४ आक्टोबरला १३५  क्विंटल हिरव्या मिरचीची आवक होऊन १००० ते  २५०० रूपये दर मिळाला.  मागील महिन्यात २७ सप्टेंबरला ११ क्विंटलची आवक होऊन १००० ते २२०० रूपये व सरासरी१६००  रूपयाचा दर मिळाला.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २५०० रुपये
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. १०) हिरव्या मिरचीची १२० क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये १ सप्टेंबरला १६२ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६ सप्टेंबरला १८३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५ सप्टेंबरला १४१ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ४०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.
२२ सप्टेंबरला ११५ क्‍विंटल आवक   झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ८०० ते १२००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २६ सप्टेंबरला १५४ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ ऑक्‍टोबरला ६३ क्‍विंटल आवक झालेल्या  हिरव्या मिरचीचे दर १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६ ऑक्‍टोबरला हिरव्या मिरचीची आवक ५७ क्‍विंटल तर दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ ऑक्‍टोबरला १२३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार  समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगलीत प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये
सांगली ः येथील शिवाजी मंडईत हिरव्या मिरचीची आवक वाढली आहे. गुरुवारी (ता. ११) स्थानिक हिरव्या मिरचीची आवक १०० पोत्यांची (एक पोते ४०-५० किलोप्रमाणे) आवक झाली. तर कर्नाटकातील मिरचीची १०० पोतींची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. येथील शिवाजी मंडईत स्थानिक आणि कर्नाटकातून मिरचीची आवक होते. बुधवारी (ता. १०) हिरव्या मिरचीची १८० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. ९) हिरव्या मिरचीची आवक २२० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर होता. गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक २० ते ३० पोत्यांनी वाढली आहे. मिरचीची आवकीत वाढ झाली असली तरी मिरचीचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली.

अकोल्यात प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये
अकोला ः येथील बाजारात हिरव्या मिरचीच्या दरात सध्या सुधारणा झाली असून, प्रतिक्विंटल १५०० ते ३००० दरम्यान दर मिळत अाहेत. गुरुवारी (ता. ११) जी ४ ही मिरची २००० ते २५००; तर खुरासणी मिरची २५०० ते ३००० दरम्यान विकल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. अावक तीन टनांपर्यंत झाली होती. मिरचीसाठी अकोल्याची बाजारपेठ प्रसिद्ध अाहे. अकोल्यासह मराठवाडा, नागपूर या भागातून मिरचीची अावक मोठ्या प्रमाणात होत असते. मध्यंतरी अावक अधिक असल्याने दर अवघे ८०० ते १५०० दरम्यान होते. सध्या यात सुधारणा झाल्याचे सांगितले जाते. गुरुवारी वेगवेगळ्या प्रकारांतील हिरवी मिरची १५०० पासून; तर ३००० दरम्यान विकली गेली. येत्या काळात अावकेत वाढ झाल्यास दरांमध्ये फरक पडू शकते, असेही सांगण्यात अाले.

जळगावात प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये दर
जळगाव ः बाजार समितीत मागील महिनाभरापासून हिरव्या मिरचीची आवक स्थिर आहे. स्थानिक भागातील जामनेर, पाचोरा व सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथून मिरचीची आवक होत आहे. प्रतिदिन सरासरी २० क्विंटल आवक झाली. मध्यंतरी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा व नंदुरबारमधूनही आवक झाली. गुरुवारी (ता. ११) २१ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये दर मिळाला. तर सरासरी ७०० रुपये दर राहीले. झाडावरच ओली लाल मिरची तयार होण्याच्या प्रक्रियेला विषम वातावरणाचा फटका बसत आहे. ढगाळ वातावरण असते. त्यातच झाडे वाकून कोलमडण्याची शक्‍यता असते. यामुळे शेतकरी हिरव्या मिरचीचे तोडे करून घेत असून, बाजारात आवक कायम आहे. मध्यंतरी कमाल दर ७०० रुपयांपर्यंत होते. त्यात मागील १०-१२ दिवसांत थोडी सुधारणा झाली. परंतु सध्या अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नंदुरबार बाजार समितीतही कमाल दर ७०० पर्यंतच होते, असे सांगण्यात आले.

परभणीत प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये
परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ११) हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यातून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ३५ ते ६५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते ३००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ११) ३५ क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये होते. तर किरकोळ विक्री ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...