शिवराज्याभिषेक सोहळा चित्ररथ ठरला देशात प्रथम

शिवराज्याभिषेक सोहळा चित्ररथ ठरला देशात प्रथम
शिवराज्याभिषेक सोहळा चित्ररथ ठरला देशात प्रथम

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील पथ संचलनात प्रदर्शित ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा’ चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांनी रविवारी (ता. २८) हा पुरस्कार स्वीकारला. तर आसाम राज्याच्या चित्ररथला दुसरा, तर छत्तीसगड राज्याने तिसरा क्रमांक पटकविला. या राज्यांनाही या वेळी गौरविण्यात आले.

राजपथावर शुक्रवारी (ता. २६) राष्ट्रपती रामनाथ काेविंद, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह आशियान विविध देशांच्या १० राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत भारत देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात पार पडला. या निमित्त आयोजित पथसंचलनात देशातील विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित करण्यात आले हाेते. या वेळी १४ राज्य व केंद्रीय मंत्रालयाचे ९ चित्ररथांचे सादरीकरण करण्यात आले हाेते. यामध्ये महाराष्ट्राच्या वतीने प्रदर्शित करण्यात आलेला ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा’ या चित्ररथाची पथसंचलनातील सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवड झाली. येथील कॅंटॉन्मेट भागातील रंगशाला शिबिरात आज आयोजित शानदार कार्यक्रमात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते राज्याला गौरविण्यात आले. मानपत्र आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. नरेंद्र विचारे, कला दिग्दर्शक नितीन देसाई आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ .. video : Sachin Nikam

या वर्षी ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ चित्ररथाची बांधणी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली. चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी तयार केले. चित्ररथावर शिवराज्याभिषेक सोहळा दर्शविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सोयराबाई, संभाजी राजे आदी १० भूमिका साकारण्यात आल्या. मुंबई येथील भैरी भवानी गृपच्या कलाकारानी या भूमिका साकारल्या. १९८० मध्ये देखील प्रथम क्रमांक राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १९८० मध्ये राज्याच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक’ दर्शविणारा चित्ररथ प्रदर्शित केला होता. तेव्हादेखील या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर १९८३ मध्ये ‘बैल पोळा’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला हाेता. यानंतर १९९३ ते १९९५ असे सलग ३ वर्षे प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. तर २०१५ मध्ये प्रदर्शित ‘पंढरीची वारी’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला हाेता. नागपूरच्या दक्षिण-मध्य केंद्राला प्रथम पुरस्कार राजपथावरील पथ संचलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात नागपूर येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राला प्रथम पुरस्काराने आज गौरविण्यात आले. या केंद्राचे संचालक इंद्रजित ग्रोवर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या केंद्राच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्याचे बरेदी लोकनृत्य सादर करण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com