महाराष्ट्रात ८ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : महाराष्ट्रात २०१७-१८ (ऑक्टोबर-सप्टेंबर) या वर्षातील साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा राज्यात ८ दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याचा अंदाजीत करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे अधिक असून मागील वर्षात ७.३ दशलक्ष साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते, अशी माहिती राज्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावरून राज्यातील ऊसउत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी, प्रतिहेक्टरी सुमारे ८०-८५ टन उसाचे उत्पादन होत असे, मात्र गेल्या हंगामातील समाधानकारक मॉन्सूनमुळे उसाचे उत्पादन १२०-१२५ टन प्रतिहेक्टरने सुधारल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रात यंदा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून या हंगामातील एकूण उत्पादन ९ दशलक्ष टनांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील साखरेचे उत्पादन ९ दशलक्ष टनांच्या आसपास असेल, मात्र आत्ताचा, आमचा सुधारित अंदाज ८ दशलक्ष टन असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आतापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ६.६९ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षीच्या ३.७५ दशलक्ष टन उत्पादनापेक्षा हे अधिक आहे. राज्यातील कारखान्यांमध्ये ६२.४ दशलक्ष टन उसाचे गाळप झाले असून गेल्या वर्षी याच वेळेला राज्यात ३३.९७ दशलक्ष टन उसाचे गाळप झाले होते.

दुसरीकडे केंद्राने चालू हंगामात साखरेचे अंदाजे उत्पादन २४.८-२४.९ दशलक्ष टन निश्‍चित केले आहे. तर साखर उद्योगाच्या वतीने एकूण २६.०-२७.० दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या संदर्भात अन्न मंत्रालय महिन्याच्या अखेरीस सर्वाधिक साखर उत्पादक राज्यांचा आढावा घेणार असून, हंगामातील उत्पादनांचा आढावा घेणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com