agriculture news in marathi, Maharashtra will be facing loss in cotton and tur production | Agrowon

राज्यात कापूस, तूर उत्पादनात यंदा मोठी घट
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मुंबई : राज्यात झालेला अनियमित पावसाने परत एकदा पीक नुकसान करत शेतीला मोठा धक्का दिला आहे. पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाल्याने राज्य सरकारला दुसऱ्या सुधारित अंदाजात पीक उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे जाहीर करावे लागले. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या दुसऱ्या सुधारित अंदाजात कापसाच्या उत्पादनात ४३ टक्के, तर तुरीचे उत्पादन तब्बल ५२ टक्के कमी होणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबई : राज्यात झालेला अनियमित पावसाने परत एकदा पीक नुकसान करत शेतीला मोठा धक्का दिला आहे. पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाल्याने राज्य सरकारला दुसऱ्या सुधारित अंदाजात पीक उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे जाहीर करावे लागले. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या दुसऱ्या सुधारित अंदाजात कापसाच्या उत्पादनात ४३ टक्के, तर तुरीचे उत्पादन तब्बल ५२ टक्के कमी होणार असल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्र हे कापूस आणि तूर उत्पादनात देशात आघाडीचे राज्य आहे. मात्र यंदा कापूस पिकावर आलेली बोंड अळी आणि पावसाच्या मोठ्या खंडामुळे तूर पिकावर झालेला परिणाम यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे २०१७-१८ या वर्षात कापूस उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत ४३ टक्के घट होऊन ९.५ दशलक्ष गाठींवरून कमी होऊन केवळ ६ दशलक्ष गाठी होईल असा अंदाज राज्य सरकाने जाहीर केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ऐन पिकांच्या वाढीच्या काळात जूनच्या शेवटी ते आॅगस्टपर्यंत पावसाने सतत उघडीप दिली होती. त्याचा फटका पिकांच्या वाढीला बसला. तसेच कापूस काढणीला आल्यानंतर पहिली वेचनी झाली न झाली तोच गुलाबी बोंड अळीने कपाशीवर आक्रमण केले. राज्यभर मोठ्या प्रमाणात बोंड अळी आल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे सरकारने कापूस उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे.

राज्यातील अन्नधान्य उत्पादनातही २०१७-१८ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत २५ टक्के घट होऊन १३.३ दशलक्ष टन होणार आहे. मका उत्पादनही यंदा ९ टक्क्यांनी घटून ३.५ दशलक्ष टनांवर स्थिरावणार आहे. तर भात उत्पादनात तब्बल ३१ टक्के घट होऊन २.७ दशलक्ष टन उत्पादन होईल, असे सुधारित अंदाजातून स्पष्ट होते.

तेलबियांमध्ये भुईमूग उत्पादनात ३८ टक्के घट होऊन २ लाख ६० हजार ५०० टन उत्पादन होईल, तर सोयाबीन आणि इतर महत्त्वाच्या तेलबिया पिकांच्या उत्पादनात १६ टक्के घट होऊन ३.९ दशलक्ष टन उत्पादन होईल. मात्र यंदा ऊस उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. मागील वर्षी २०१६-१७ मध्ये उसाचे ५०.६ दशलक्ष टन उत्पादन झाले होते तर यंदा ६७.९ दशलक्ष टन उत्पादन होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

पीकनिहाय सुधारित अंदाज असा
(कंसात मागील वर्षातील उत्पादन) (दशलक्ष टनांत)

भात २.७ (३.९)
मका ३.५ (३.८)
तूर ९.८३ लाख टन (२.०४ दशलक्ष टन)
सोयाबीन ३.९ (४.६)
ऊस ६७.९ (५०.६)
कापूस ६ दशलक्ष गाठी (१०.६ द. ल. गाठी) 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...