राज्यात गेल्या दीड दशकामध्ये गटशेतीचे मूळ बऱ्यापैकी धरले अस
ताज्या घडामोडी
मुंबई : सणसवाडी हिंसाचार हाताळण्यास गृह विभागाने कसूर केली असून, पोलिसांनी या प्रकरणात अक्षम्य हेळसांड केल्याचा आरोप करत भारतीय बहुजन महासंघाने आज (बुधवार) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरात प्रतिसाद मिळत आहे. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत बंदचे पडसाद उमटत असून, अनेक ठिकाणी रास्ता रोको व विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. डाव्या आणि दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला मराठा संघटनांनीही प्रतिसाद दिला आहे.
राज्यातील परिस्थिती :

- मुंबई: चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर सकाळी ६ वाजता दगडफेक, बेस्टची वाहतूक आणि अनेक भागात रेल्वे ठप्प
- औरंगाबाद: शहरातील इंटरनेट सेवा बंद; एसटी महामंडळाची सेवा दुपारी १२ वाजेपर्यंत बंद, परिस्थितीनुसार पुढील निर्णय
- कोल्हापूर: एसटी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल, महानगरपालिकेची परिवहन सेवाही बंद ठेवण्यात आल्याने चाकरमान्यांची गैरसोय
- पुण्यात स्कुल बसेस बंद, पीएमपीची सेवा सुरळीत सुरु, रस्त्यावर तुलनेने कमी गर्दी, दुकाने, बाजारपेठ अद्याप बंद
- मुंबई: जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आल्याची मुंबई डबेवाला असोसिएशनची माहिती
- पालघरमध्ये कडकडित बंद, जिल्ह्यातील 10 संघटनांनी पुकारलेल्या बंदला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठा बंद
- नागपूर: 'महाराष्ट्र बंद' मुळे विद्यार्थी आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी बहुतांश संस्थांकडून शाळा बंद
- ठाणे: ४ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश
- रत्नागिरी: महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गुहागर आगारात एसटी थांबवून ठेवल्या
- अमरावती बसस्थानकांवरून यवतमाळ, वाशीम, अकोला जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
- वणीत कडकडीत बंद, खाजगी शाळांना सुट्टी, सलग दुसऱ्या दिवशी वणीतील जनजीवन विस्कळीत, एसटी बसेससह खाजगी वाहनेही बंद, प्रवाशी व चाकरमान्यांची गैरसोय
- 1 of 351
- ››